Maharashtra School Starts Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra School Starts: डब्बा-बॉटल घेतली का? दप्तर भर...; सुट्टी संपली, शाळांमध्ये आजपासून पुन्हा किलबिलाट

काही शाळांमध्ये या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं विविध पद्धतीने स्वागत केले जात आहे.

साम टिव्ही ब्युरो

निवृत्ती बाबर

Schools Starts: राज्यभरातील शाळा उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर आजपासून पुन्हा एकदा सुरू होत आहेत. नव्या शालेय शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे. राज्यभरातील शाळांची आज सकाळी ७.३० वाजताच घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी अनेक शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे. शिवाय काही शाळांमध्ये या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं विविध पद्धतीने स्वागत केले जात आहे. (Latest Marathi News)

आजपासून २०२३ ते २४ या नवीन शैक्षणिक सत्रास सुरुवात होत आहे. शाळेचा पहिला दिवस, विध्यार्थी,पालक,शिक्षक सर्वांमधेच उत्सुकता दिसतेय. मोठ्या सुट्टीनंतर शाळा सुरु झाल्याने सकाळी सर्वच विद्यार्थांनी शाळेला हजेरी लावली आहे. राष्ट्रगीत, प्रार्थना करुन विध्यार्थी वर्गात बसले आहेत. विध्यार्थ्यीनींनी शाळेत सकाळी येऊन मैदानात सुबक अशी रांगोळी काढली आहे. तसेच प्रवेशोत्सवाची तयारी केली.

पहिल्याच दिवशी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी देखील स्वागत केले आहे. आपल्या ट्वीटर अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, शिक्षणाचा श्रीगणेशा ज्या शाळेतून होतो, त्या शाळेचा पहिला दिवस अत्यंत महत्त्वाचा. राज्यात आजपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. शालेय शिक्षणमंत्री या नात्याने शाळांमध्ये पहिल्या दिवशी येणाऱ्या सर्व चिमुकल्यांचे सहर्ष स्वागत आणि आशीर्वाद.

आजी आजोबा दिवस साजरा होणार...

येत्या शैक्षणिक वर्षात एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे 'आजी आजोबा दिवस' साजरा करण्यात येणार असल्याचीही माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे. "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार. 20 मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे. शिक्षक सेवकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.

तसेच यावेळी बोलताना, "कमी पटसंख्येंच्या शाळा बंद कराव्या लागू नयेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत. मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये करणार आहोत. मुलांच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केलं जाणार असल्याचेही" ते म्हणाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: पर्समध्ये वेलची ठेवण्याचे 'हे' आहेत अद्भुत फायदे

Success Story: रेल्वे स्टेशनवर हमाली, लेकीसाठी स्वप्न बघितलं; UPSC मध्ये तिनदा अपयश, तरीही खचले नाहीत, आता आहेत IAS ऑफिसर

धक्कादायक! चार वर्षांच्या चिमुकल्याच्या घशामध्ये चिकटली टॉफी; श्वास थांबल्याने झाला मृत्यू

Viral Video: फुटबॉल खेळताना खेळाडूच्या अंगावर पडली वीज; एकाचा मृत्यू, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

Ambarnath News : अंबरनाथमध्ये उबाठाचे उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याचा आरोप; अपक्ष उमेदवार सुनील अहिरे यांची तक्रार

SCROLL FOR NEXT