Scholarship Exam saam tv
महाराष्ट्र

Scholarship Exam: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल, 'या' दिवशी होणार पेपर

School Student: शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या ८ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Priya More

Summary -

  • शाळकरी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

  • शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे

  • इयत्ता ५ वी आणि ८ वी विद्यार्थ्यांची होते शिष्यवृत्ती परीक्षा

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी आता काही दोन महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तयारील लागावे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक (इयत्ता ५ वी) आणि माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला असून आता ही परीक्षा २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेला राज्यातील अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झालेले असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.

दरम्यान, विधी परीक्षा देखील लांबणीवर गेल्या आहेत. पहिल्या सत्रातील परीक्षा फेब्रुवारीत होणार आहेत. अभ्यासक्रमाचा शैक्षणिक कालावधी पूर्ण न झाल्यामुळे आणि प्रवेश उशिरा झाल्याने मुंबई विद्यापीठाने डिसेंबर महिन्यात घेण्यात येणारी विधी अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलली. ही परीक्षा आता दीड महिन्यांनंतर म्हणजे ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT