Sanjay Raut On Eknath Shinde Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : 'अमित शाह शिंदेंचं ऑपरेशन कधी करतील, ते त्यांनाही कळणार नाही' संजय राऊत यांचं रोखठोक विधान

Sanjay Raut On Eknath Shinde : संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

Yash Shirke

Maharashtra Politics : काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत विधान केले होते. त्याशिवाय त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नाराजीवरही स्पष्टीकरण दिले. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी "अमित शाह शिंदेंच ऑपरेशन करतील त्यांनाही कळणार नाही", असे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले, "एकनाथ शिंदे यांचं ऑपरेशन अमित शाह कधी करतील, ते त्यांनाही कळणार नाही. अमित शाह यांनी शब्द पाळला असता, तर ती घडामोड झाली नसती. २०१९ ला आम्ही चर्चा केली असं ते म्हणत आहेत. मग २०१४ ला काय झालं होतं? तेव्हा भाजपाने का युती तोडली होती? शिवसेना प्रमुख नाहीत या आनंदात भाजपने निवडणुका लढवल्या. देवेंद्र फडणवीस यांना विजयाचा हॅग ओव्हर झाला आहे किंवा ते सतत विजय पाहून डिपरेस झाले आहेत."

"आम्ही खुर्चीसाठी लढत होतो असं ते म्हणतात. आम्ही खुर्चीसाठी लढत होतो तर ते कशासाठी लढत होते. महाराष्ट्रातील सरकार ही येड्याची जत्रा आहे. मुख्यमंत्री पगाची खुर्ची गेल्यानंतर फडणवीस यांचा तो चेहरा पाहिला आहे. ज्यांची खुर्ची गेली ते कसे रुसुन बसत आहेत तेही आम्ही पाहतोय", असे म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील काही दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यांची नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचे लोक म्हणत होते. यावर स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस यांनी "एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्व धीर-गंभीर स्वरुपाचे आहे. त्यांचे हसणारे फोटो आहेत. पण ते फार कमी हसतात. त्याचा चेहरा फार गंभीर आहे. शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांचा चेहरा तसाच होता. उपमुख्यमंत्री बनले आताही त्यांचा चेहरा तसाच आहे. एकना गंभीर चेहरा दाखवून ते नाराज आहे अशा चर्चा पसरवल्या जातात" असे वक्तव्य केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT