RENOWNED CARDIOLOGIST DR MEHUL RATHOD FOUND DEAD IN CAR, POLICE PROBE UNDERWAY IN LATUR saam tv
महाराष्ट्र

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Famous Cardiologist Doctor Found Dead Inside Car: लातूरमधील एका धक्कादायक घटनेने वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडले आहे. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि 'एमजे हॉस्पिटल'चे संचालक डॉ. मेहुल राठोड हे त्यांच्या कारमध्ये मृत अवस्थेत आढळले.

Bharat Jadhav

  • लातूरमधील प्रसिद्ध डॉक्टराचा मृत्यू

  • मेहुल राठोड आत्महत्या प्रकरण

  • एम जे हॉस्पिटल संचालक मृत्यू तपास

लातूरमधून वैद्यकीय क्षेत्राला हदरवणारी घटना समोर आली आहे. शहरातील प्रसिद्ध एम.जे हॉस्पिटलचे संचालक, आणि हृदयरोग तज्ञ डॉक्टर मेहुल राठोड यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. लातूरकडून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या महामार्गालगत त्यांची कार आढळली. त्या कारमध्ये त्यांनी गुंगीचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान या आत्महत्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. तर आत्महत्येचं नेमकं कारण एमआयडीसी पोलीस तपासत आहेत.

कोण होते डॉ. राठोड?

डॉक्टर मेहुल राठोड हे लातूरमधील बर्शी रोड परिसरातील एक अत्यंत प्रतिष्ठित कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ होते. त्यांच्याकडे एमडी आणि डीएनबी अशा उच्च वैद्यकीय पदव्या होत्या. गेल्या दहा वर्षांहून अधिकचा काळ ते वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. बार्शी रोड येथील एम. जे. हॉस्पिटल क्लिनिकमध्ये रुग्णसेवा करत होते.

डॉ. राठोड हे अत्यंत गुंतागुंतीच्या हृदयविकारांवरही योग्य आणि आधुनिक पद्धतीने उपचार करत, त्यात त्यांचा हातखंडा होता. यामुळे लातूरमधील एक अत्यंत विश्वासू डॉक्टर म्हणून त्यांची मोठी ख्याती होती. डॉक्टर राठोड हे त्यांच्या वैद्यकीय कौशल्यासोबतच अत्यंत मनमिळावू आणि संवेदनशील स्वभावासाठी परिचित होते.

डॉक्टर मेहुल राठोड यांनी आत्महत्या का केली?

डॉक्टर मेहुल राठोड यांनी टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे कारण अजूनही समजू शकलेले नाहीये. या घटनेची माहिती मिळताच लातूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून अत्यंत वेगाने सुरू आहे. दरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळून आली नाहीये. त्यामुळे डॉक्टर राठोड यांनी आत्महत्या का केली याचे गूढ उकलणं हे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT