MAHARASHTRA RELIGIOUS FREEDOM ACT 2026 TO COME INTO FORCE FROM AUGUST 28 saam tv
महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाला फडणवीस सरकार देणार मोठं गिफ्ट; थेट आदेशच काढला

Maharashtra Anti Conversion Law 2026 Implementation Date: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६ येत्या २८ ऑगस्टपासून राज्यात लागू होणार आहे. गृह विभागाने अधिसूचना जारी केली असून जबरदस्ती, फसवणूक, आमिष किंवा लग्नाचे आश्वासन देऊन होणाऱ्या धर्मांतरावर कारवाईची तरतूद आहे.

Ganesh Kavade, Omkar Sonawane

राज्यात धर्मांतरासंदर्भातील नव्या कायद्याच्या अंमलबजवणीचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026 येत्या 28 ऑगस्ट 2026 पासून राज्यभर लागू होणार आहे. याबाबत राज्याच्या गृह विभागाकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. गृह विभागाने 17 ऑगस्ट रोजी ही अधिसूचना जारी केली. Notification No. NAX-0724/C.R.240/Spl-1B नुसार महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026 मधील तरतुदी लागू करण्यासाठी 28 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी रक्षाबंधन असल्याने सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठे गिफ्ट देण्यात आले. राज्यपालांच्या आदेशानुसार व त्यांच्या नावाने गृह विभागाचे उपसचिव प्रितमकुमार जावळे यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

या कायद्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची मंजुरी मिळाल्यानंतर तो अधिकृत राजपत्रात प्रकाशित करण्यात आला. आता निश्चित करण्यात आलेल्या तारखेपासून हा कायदा महाराष्ट्रात लागू होईल.

बळजबरीच्या धर्मांतराला आळा घालण्याचा उद्देश

बळजबरी, फसवणूक, आमिष, खोटी माहिती किंवा लग्नाचे आश्वासन देऊन करण्यात येणारे धर्मांतर रोखणे हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये या कायद्यानुसार कारवाई करता येणार आहे.

सात वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, २०२६ यंदाच्या मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाने मंजूर केला होता. त्यानंतर विधेयक राज्यपालांकडे आणि पुढे राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आले. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर कायद्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे २८ ऑगस्टपासून राज्यातील बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांवर कारवाई करण्यासाठी नव्या कायद्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. त्यामुळे आता जबरदस्तीने धर्मांतरण करणाऱ्या प्रवृत्तीला कायद्याचा दणका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT