Maharashtra Rainfall  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Video: मुंबईसह राज्यात धुवाधार पाऊस, नदी-नाल्यांना पूर; घरांमध्ये शिरले पाणी

Heavy Rainfall In Maharashtra: बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात आज मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Priya More

राज्यामध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, शहापूर याठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला आहे त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात कुठे काय परिस्थिती आहे हे आपण पाहणार आहोत...

मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहे. अद्याप मुंबईत कुठे पाणी साचल्याची घटना घडली नाही. नवी मुंबईत देखील रात्रभर पावसाने जोरदार बॅटिंग केलीये. नवी मुंबई शहरात सर्वत्र रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. बेलापूर ते दिघा सर्व आठ विभागात जोरदार पाऊस झाला असून जोरदार पावसाने नवी मुंबईकर सुखावले आहेत. सकाळी देखील पावसाची संततधार सुरुच आहे.

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज सकाळपासूनच कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात जोरदार हजेरी लावली. सकाळपासून याठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. महत्वाचे म्हणजे चांगाला पाऊस पडत असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावला आहे.

ठाणे, शहापूर तालुक्यात अति मुसळधार पाऊस जनजीवन विस्कळित शहापूर शहराती भारंगी नदीचा पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने अडकलेल्या लोकांना जीवरक्षक टिमचे सदस्यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले अनेक वाहने देखील पाणी खाली

रात्री पासूनच पावसाने शहापूर तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले आहेत मध्य रेल्वेच्या कसारा व खर्डी दरम्यान असलेल्या उंबरमाली रेल्वे स्टेशन वर पावसाचे पाणी साचल्याने रेल्वे स्टेशन ला नदीचे स्वरूप आले होते. कल्याण कडे जाणारी रेल्वे वाहतूक काही काळापासून बंद करण्यात आली आहे.

कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडीत पावसाचा जोर चांगला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील नदी, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी, लांजा, राजापूर, साखरपा परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. संगमेश्वर तालुक्यातील गडनदीला पूर आल्याने पूराचं पाणी माखजन बाजारपेठेत शिरलं आहे. सध्या बाजारपेठेला पुराच्या पाण्याचा वेढा आहे.

दरम्यान, सोलापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. सोलापुरातील हांडे प्लॉट परिसरात तुंबलेल्या ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरले आहे. घरात ड्रेनेजचे पाणी शिरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बंजारा समाजाच्या आरक्षण मागणीवर शासन दरबारी सकारात्मक विचार सुरू

Infertility Issue: जास्त तणावामुळे वंध्यत्वाची समस्या होते का?

Bhadgaon News : भडगाव शहर स्फोटाने हादरले; हॉटेलमधील भीषण स्फोटात १० जण जखमी

Viral News : देने वाला जब भी देता...! तासभर पडला पैशांचा पाऊस, लोकांची उडाली झुंबड; अनेकांनी नोटा टाकल्या खिशात

Nana Patekar : माझ्या लोकांचं रक्त सांडलेलं आहे तिथे... Ind Vs Pak सामन्याला नाना पाटेकरांचा तीव्र विरोध, VIDEO

SCROLL FOR NEXT