Maharashtra August rainfall deficit 2026 and impact on Kharif crops saam tv
महाराष्ट्र

पावसाची पाठ, खरिपाचा घात; राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट

Rainfall Deficit Hits Maharashtra: महाराष्ट्रात पावसाला ब्रेक लागलाय. पावसाने पाठ फिरवल्याने खरीपाचा हंगाम धोक्यात आलाय. पिके करपू लागल्याने शेतकरी संकटात सापडलाय. कोणत्या जिल्ह्यात पावसाची किती तूट आहे ?

Girish Nikam

महाराष्ट्रात पावसाला ब्रेक लागलाय. ऑगस्ट अखेरीस राज्यात 54 टक्के पावसाची तूट असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये खरिपाच्या पिकांसाठी लागणाऱ्या अखेरच्या पावसानं पाठ फिरवली आणि हाता तोंडाशी आलेला खरिपाचा हंगाम बळीराजाच्या हातातून गेला. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचं सावट पसरलंय. सध्या हलक्या श्रावण सरी पडत असल्या मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवलेला नाही. विदर्भ आणि मराठवाड्यात गंभीर स्थिती आहे.

लातूर जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद झालेय. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद यांसारखी पिके करपू लागली आहेत. ओलावा संपल्याने पिकांची वाढ खुंटलीये... तसेच 179 गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे.

तर बीड जिल्ह्यात पावसाने गेल्या दोन महिन्यांपासून पूर्णपणे दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कापूस, सोयाबीन आणि तूर ही खरीप पिके पाण्याअभावी करपली आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वाढता खर्च आणि दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

दुसरीकडे विदर्भही कोरडा आहे. बुलढाणा जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्याने खामगाव तालुक्यात सोयाबीनचे पिक पूर्णपणे सुकलेय. हातातोंडाशी आलेली हजारो हेक्टरवरील खरीप पिके वाया गेली आहेत.

नागपूर: 78 टक्के तूट

अमरावती: 86 टक्के तूट

अकोला: 85 टक्के तूट

वर्धा: 84 टक्के तूट

यवतमाळ: 79 टक्के तूट

बीड: 85 टक्के तूट

धाराशिव: 73 टक्के तूट

अहिल्यानगर: 74 टक्के तूट

सोलापूर: 77 टक्के तूट

जळगाव: 21 टक्के तूट

खरीपाचा हंगाम हातचा गेल्याने शेतकरी हतबल झालाय. अस्मानी संकटाने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आलंय. सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सून तूट भरुन काढणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुष्काळाचं सावट असल्याने सरकार काय उपाययोजना करतंय ते पाहणंही महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lionel Messi: 'मेस्सी'वादळ शमलं...! जगज्जेत्या खेळाडू आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त

शिळ्या भातात काय प्रक्रिया होते? शरीरासाठी फायदेशीर असतं की नुकसानकारक?

Fact Check: इथेनॉलमुळे अंडी महागली? कुक्कुटपालनासाठी मक्याचा तुटवडा?

श्रावणी सोमवारी काळाचा घाला! महादेवाचे दर्शन करून परतताना जीपचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Kulfi Recipe : मलाई कुल्फी खायची इच्छा झाली? घरच्या घरी अशी बनवा झटपट कुल्फी

SCROLL FOR NEXT