Maharashtra Weather Update Today News  AI
महाराष्ट्र

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Update Today News : राज्यातील पावसाचा जोर पुढील काही दिवसांत कमी होण्याची शक्यता असून अल् निनोचा प्रभाव ऑगस्टमध्ये वाढणार असल्याचा IMD चा अंदाज आहे. रायगड आणि पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट तर अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण हवामान अपडेट.

Alisha Khedekar

  • अल् निनोचा प्रभाव वाढल्याने ५ ऑगस्टनंतर महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता

  • रायगड आणि पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी

  • कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा भागात जोरदार पावसाचा अंदाज कायम

  • पावसाचा जोर कमी झाल्यानंतर राज्यात उकाडा वाढण्याची शक्यता

राज्यात पावसाचा जोर हळू हळू कमी होत असून पुढील २ महिन्यात अल निनोचा प्रभाव तीव्र होणार आहे. याचा परिणाम हवामानावर पडणार असून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होऊन नागरिकांना उकाड्याला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. हवामान विभाच्या अंदाजानुसार, आज राज्यातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिली असली, तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.

IMD च्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा भागांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे. तसेच रायगड आणि पुणे जिल्ह्यांच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांसाठीही येलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू राहील. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडू शकतात.

हवामानावर अल निनोचं संकट

भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनवर अल् निनोचा प्रभाव राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता. सुरुवातीला मान्सून उशिरा दाखल झाल्याने आणि जूनच्या पहिल्या तीन आठवड्यांत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे पेरण्यांना वेग आला, तसेच धरणांतील पाणीसाठ्यातही वाढ झाली. मराठवाडा आणि विदर्भातील पावसाची तूटही काही प्रमाणात भरून निघाली. मात्र हवामान तज्ज्ञांच्या मते, ५ ऑगस्टनंतर राज्यातील पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात अल् निनोचा प्रभाव वाढल्याने पावसाचे प्रमाण घटू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blast: नमाज पठण करताना मशिदीत भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध; दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Saturday Horoscope : ६ राशींची होणार चांदी; कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Saree Colour Tips: साडीत दिसाल एकदम स्लिम अन् गॉर्जियस! बॉलिवूड अभिनेत्री फॉलो करतात हा सिक्रेट कलर फॉर्म्युला

SCROLL FOR NEXT