Maharashtra Rain Alert google
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert: राज्यात 5 दिवस अतिमुसळधार पाऊस; कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट, मुंबई-पुण्यातील हवामानाचा अंदाज काय?

Heavy Rain Warning : राज्याच पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातला कमी दाब क्षेत्रामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती पण आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर काही भागांत तुरळक स्वरूपाचा पाऊसही अनुभवायला मिळू शकतो. मात्र, घाटमाथा आणि किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या प्रणालीचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून ३ जुलैनंतर महाराष्ट्रात पावसासाठी अधिक अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

यंदा जून महिन्यात महाराष्ट्रात मान्सूनचा प्रभाव सर्वच ठिकाणी जाणवला नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस नोंदविण्यात आला. राज्यात जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे ५० टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. देशपातळीवरही परिस्थिती फारशी वेगळी नसून जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा सुमारे ४० टक्के कमी पाऊस झाला आहे.

मात्र, अलीकडच्या काळात ढगांची तीव्रता वाढल्यामुळे मान्सूनने पुन्हा गती घेतली आहे. मान्सूनने मध्य प्रदेश, संपूर्ण छत्तीसगड आणि बिहारमधील बहुतांश भाग व्यापला आहे. तरीदेखील देशातील काही भागांमध्ये अद्याप मान्सून पोहोचलेला नाही.

दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. विशेषतः किनारपट्टी आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

konkan Beach : महाराष्ट्रातील मिनी मालदीव! कोकणातील समुद्राच्या सौंदर्याला तोड नाही, एकदा फेरफटका माराच

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT