Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

पावसाचं रौद्ररूप! संसार उघड्यावर, गावं पुराच्या विळख्यात; सोलापूरसह ३ जिल्ह्यांत शाळांना सुट्टी

Maharashtra heavy rain latest news today schools closed : महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार! बीड, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी. जनजीवन विस्कळीत, गावं पाण्याखाली.

Namdeo Kumbhar

Maharashtra Rain News Update : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. अति मुसळधार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहतोय. जन जीवन विस्कळीत झालेय. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. नद्या-नाल्यांना पूर आल्यामुळे गावांना पाण्याने वेढा घातलाय. बीड, सोलापूर आणि धाराशिवमध्ये परिस्थिती अधिकच भयानक झाली आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून या तीन जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. आजही बीड, सोलापूर, धाराशिव आणि जालन्यात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सोलापुरात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलाय. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अस्मानी संकटामुळे सर्वजण हतबल झाले आहेत. सरकारकडून मदतीसाठी सर्वोत्परी प्रयत्न केले जातेय. खबरदारी म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यात शाळांना, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पूरस्थितीमुळे नागरिकांच प्रचंड हाल झाले आहे. पूर परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेय.

बीड जिल्ह्यातील अंगणवाडीसह सर्व शाळा कॉलेज यांना सुट्टी

बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानिक शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

बीड जिल्ह्यात दोन पासून जोरदार पाऊस चालू आहे. बीड जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तसेच तालुक्यातील नद्यांनी धोका पातळी ओलांडली असल्याने बीड जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक महाविद्यालय यांना सुटी जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI Live सामन्यात प्रेमाचा राडा, तरूणीनं तरूणाच्या कानाखाली जाळ काढला, नेमकं झालं काय? पाहा व्हिडिओ

Mumbai Elphinstone Bridge : 59 कोटींचा अडथळा, एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम रखडणार | VIDEO

Alibaug Tourism : दिवाळी अन् किल्ल्यावर भटकंती, अलिबागजवळ वसलंय प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण

PM Kisan Yojana: ३१ लाख शेतकर्‍यांचा पत्ता कट, 'पीएम किसान'च्या पडताळणीनंतर कारण आलं समोर; तुमचं नाव तर नाही ना?

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

SCROLL FOR NEXT