Maharashtra Rain Update
Maharashtra Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: राज्यात पुढील दोन दिवस 'रेड अलर्ट'; या जिल्ह्यात मुसळधार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: पुढील दोन दिवस दक्षिण कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट' आणि उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. येत्या तीन दिवसांत पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यासाठी ६ ते ८ जुलै आणि कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यासाठी ७ ते ९ जुलैपर्यंत रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

कास रात्रीपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरुच आहे. वसई विरार मध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आल्या आहेत. रस्त्यांवर गुढगाभर पाणी साचल्याने स्कूल बस बंद आहेत. रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अधून मधून पावसाच्या सरी, रेड अलर्ट कायम असल्याने प्रशासन सज्ज आहे.

हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिला असला तरी जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कमी असल्याचे दिसत आहे. अलिबागसह जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असून पावसाची रिपरिप सुरू आहे.

नवी मुंबईतही सकाळपासून पावसाची(Rain) संततधार सुरूच आहे. सलग चार दिवस नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसाचा जोर जास्त वाढल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

पालघरमध्ये आज सकाळपासून पावसाला(Rain) सुरुवात झाली आहे. येत्या दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

सिंधुदुर्गात पहाटे पासूनच पावसाची संततधार रिपरीप तर काही वेळा मोठ्या सरी कोसळत आहेत. सध्या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी असली तरी मोठा पाऊस झाल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या २२ जवानांचे एक पथक सिंधुदुर्गात तैनात करण्यात आले आहे. हे पथक पुढील तीन दिवस जिल्ह्यात कार्यरत आहे. हवामान विभागाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी व सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाप्रशासना कडून देण्यात आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Bihar Wedding Viral News : अजब-गजब प्रेम कहाणी: विधूर जावयासोबत सासऱ्यानेच लावलं बायकोचं लग्न

May Month Horoscope: या राशींसाठी येणारे 30 दिवस ठरतील वरदान, मेष राशीत मंगळाचा प्रवेश ठरणार लाभदायक

Lok Sabha Election: पहिल्या दोन टप्प्यात भाजपला कमी मतदान? प्रचारासाठी आता BJP ने तयार केला नवीन गेम प्लॅन?

Kalyan Lok Sabha: राज ठाकरेंचे जे विचार आहेत, तेच आमचे विचार, मनसे शिवसेनेचा डीएनए एकच: श्रीकांत शिंदे

SCROLL FOR NEXT