Maharashtra Rain Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: मेळघाटात मुसळधार पाऊस; ३५ वर्षीय युवक वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला

आज पहाटेपासून मेळघाटात मुसळधार पाऊस सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती: आज पहाटेपासून मेळघाटात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. मोळघाटातील सिपणा नदीला महापूर आला आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या नदीच्या प्रवाहात एक युवक वाहून गेला असल्याची माहिती समोर आली आहे. कृष्णा कासदेकर अस या युवकाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. नंदूरबासह, विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.

राज्यातील काही भागांत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस बरसला आहे. आज काही प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली आहे. तर विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. अमरावती मधील मेळघाटात काही तासांपासून जोरदार पाऊस (Rain) सुरू आहे.

पुढील दोन दिवस मुंबईत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई शनिवारी 'रेड' अलर्टवर होती पण फक्त २.२ मिमी पाऊस (Rain) झाला. मात्र, पाऊस सुरूच होता. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील १३० गावांमध्ये अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात येणाऱ्या या गावांमध्ये पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका अनेक लोकांना बसला आहे.

पूरग्रस्त गावांमधून किमान २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. गडचिरोली, हिंगोली आणि नांदेड हे तीन जिल्हे गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसानंतर सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. गुरुवारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) रेड किंवा ऑरेंज अलर्ट सुरू असलेल्या दिवसांमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर लोकांना प्रवेश करण्यास बंदी घालणारा आदेश जारी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पत्नीवर अनैतिक संबंधाचा संशय, पती अन् मित्राकडून आळीपाळीनं बलात्कार; नंतर हात पाय बांधून नदीत फेकून दिलं

Aneet Padda : 'सैयारा'च्या यशानंतर अनीत पड्डाला लागला जॅकपॉट, मिळाली मोठ्या प्रोजेक्टची ऑफर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

SCROLL FOR NEXT