Maharashtra Weather Update saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain: राज्यात पुढचे ४ दिवस कोसळधार, कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता अलर्ट? वाचा हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूर आला आहे. राज्यासाठी पुढचे ४ दिवस महत्वाचे असणार आहे. कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे घ्या जाणून...

Priya More

Summary -

  • महाराष्ट्रात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

  • अनेक जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • सततच्या पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

  • पावसामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

राज्यासाठी पुढचे ४ दिवस महत्वाचे राहणार आहे. कारण हवामान खात्याकडून राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडणार आणि कोणता अलर्ट देण्यात आला आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

१६ सप्टेंबर -

संभाजीनगर, रायगड, पुणे आणि घाटमाथा परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्हयांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

१७ सप्टेंबर -

रत्नागिरी, रायगड, पुणे, पुणे घाट, ठाणे, मुंबई, पालघर, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, नाशिक, नाशिक घाट, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, जालना, परभणी, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तर उर्वरीत जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देणअयात आला आहे.

१८ सप्टेंबर -

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, नाशिक घाट, धुळे, नंदुरबार, संभाजीनगर, जळगाव आणि जालना जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्त्यता आहे. तर उर्वरीत जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

१९ सप्टेंबर -

रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरीत जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला,नवरा समीरचे तुकडे करत मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT