Ashwini Vaishnaw Devendra Fadnavis railway 
महाराष्ट्र

Railway Project : एसी लोकल ते कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, महाराष्ट्रासाठी रेल्वेच्या महत्वाच्या घोषणा

Maharashtra railway projects 2025 : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रासाठी नवीन रेल्वे मार्गांची घोषणा केली. गोंदिया-बल्लारशाह, जळगाव-जालना मार्ग आणि मुंबईत एसी लोकल सेवा वाढणार.

Namdeo Kumbhar

Ashwini Vaishnaw Devendra Fadnavis railway : महाराष्ट्रात रेल्वेच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने १ लाख ७३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. या प्रकल्पांमुळे राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारेल आणि विशेषतः विदर्भाला मोठा फायदा होईल, असे सांगितले. मुंबईमध्ये नव्या एसी लोकल सुरू केल्या जातील, असेही यावेळी रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्रसाठी नव्या रेल्वे मार्गांची घोषणा केली. गोंदिया-बल्लारशाह आणि जळगाव-जालना या नव्या रेल्वे मार्गांची घोषणा रेल्वेमंत्र्यांकडून करण्यात आली. याशिवाय, कल्याण-आसनगाव दरम्यान चौथ्या मार्गिकेचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे सांगितले.

मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवेत सुधारणा करण्यासाठी एसी लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना अधिक सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल. वैष्णव यांनी सांगितले की, महाराष्ट्रात रेल्वेचे जाळे वेगाने विस्तारण्यावर भर दिला जात आहे आणि यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. केंद्राकडून मिळणारा निधी महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाला गती देईल, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रेल्वेचे जाळे उभारले जाणार आहे. मुंबईत अनेक रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. विदर्भाला मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रात वेगाने रेल्वेचं जाळं तयार करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रासाठी निधी देत आहेत, त्याचा फायदा होणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गोंदिया बल्लारशाह हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर विदर्भाला जास्त फायद होईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर विदर्भातील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. मुंबईसह राज्यभरात अनेक रेल्वे प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील प्रवास सुलभ होईल आणि रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होतील, असे फडणवीस यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manifestation : मॅनिफेस्टेशन करणे म्हणजे काय ? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: - सांगली जिल्हा बँक संचालक आणि अधिकाऱ्यांना नोटिस

Shocking: बॉयफ्रेंडसोबत मिळवून नवऱ्याला मारलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनखाली गाडले; तिथेच जेवण बनवून जेवायची बायको

Shocking News : बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायला अन् जागीच कोसळला, क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू

Voting Documents: या पुराव्यांशिवाय तुम्ही मदतान करू शकणार नाही! वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT