New Year Gift Saam TV
महाराष्ट्र

New Year Gift: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! नाताळ-नववर्षाला उशिरा रात्रीपर्यंत सुरु राहणार वाईन शॉप; जाणून घ्या वेळ?

Liquor shop: मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. शासनाने तीन दिवस ही परवानगी दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

New Year 2024:

मद्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नाताळ आणि नववर्षानिमित्त मुंबईतील हॉटेल, बार आणि पब्स उशिरापर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. शासनाने तीन दिवस ही परवानगी दिली आहे.

यानुसार, या महिन्यात 24, 25 आणि 31 डिसेंबरला मद्य किरकोळ विक्रीची दुकानं रात्री 10.30 ते रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एक्साईज विभागाने यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिपत्रकात काय लिहिलं आहे?

या परिपत्रकात लिहिलं आहे की, ''उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्रास अनुलक्षून महाराष्ट्र दारुबंदी कायद्याचे कलम १३९ (१) (सी) व कलम १४३ (२) (एच १) (iv) अन्वये खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे नाताळ व नववर्षानिमित्त दिनांक २४.१२.२०२३, दिनांक २५.१२.२०२३ व दिनांक ३१.१२.२०२३ रोजी राज्यातील विविध मद्य विक्री अनुज्ञप्त्या निर्धारित वेळेनंतर रात्री उशीरापर्यंत उघड्या ठेवण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे.'' (Latest Marathi News)

यात माहिती देण्यात आली आहे की, पोलिस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री ११:३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५.०० वाजेपर्यंत आणि पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्रासाठी रात्री १:३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजेपर्यंत क्लब सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच मध्यरात्री १२:०० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजेपर्यंत बिअर बार सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय महानगरपालिका तसेच, अ, व आणि ब वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तींसाठी रात्री ११:०० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १.०० वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १०:०० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १.०० वाजेपर्यंत बार आणि वाईन शॉप सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

SCROLL FOR NEXT