Congress leader Vijay Wadettiwar reacts to speculation over a possible move to the Shinde-led Shiv Sena amid Maharashtra's changing political landscape. Saam Tv
महाराष्ट्र

विजय वडेट्टीवार काँग्रेसची साथ सोडणार? शिवसेनेच्या ऑफरवर काय म्हणाले, वडेट्टीवार?

Vijay Wadettiwar On Shiv Sena Offer: शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Bharat Jadhav

  • विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा रंगली.

  • ऑपरेशन टायगरनंतर शिंदे गटाचा मोर्चा आमदारांकडे वळल्याची राजकीय चर्चा.

  • उदय सामंत यांच्या ऑफरमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण.

ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचं वजन वाढलंय. एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर अंतर्गत इतर पक्षातील नेत्यांना गळाला लावणार आहे. खासदारांनंतर शिंदे गटाने मोर्चा आता आमदारांकडे वळवल्याची चर्चा असून मंत्री उदय सामंत यांनी विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. उदय सामंत यांच्या ऑफरमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. माझ्या संदर्भात अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगून विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसची साथ सोडणार असल्याची चर्चा फेटाळून लावली आहे. मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आणखी जोरदार चर्चा सुरू झाली.

सामंत म्हणाले, विजय वडेट्टीवार आमचे चांगले मित्र आहेत. ते एकनाथ शिंदेंचेही चांगले मित्र आहेत. विदर्भातील ताकदीचे नेते आहेत. त्यांनी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला तर सर्वात जास्त मला आनंद होईल. खरंतर मी स्वत: देखील विजय वडेट्टीवार यांच्यासोबत काम केलंय. मंत्री उदय सामंत यांच्या विधानावर विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलंय.

माझ्या बदनामीचं राजकारण थांबवा. मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असून काँग्रेसने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला आहे. परंतु काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचे काम करता आहेत.असं विजय वडेवट्टीवार म्हणालेत.

माझ्या बदनामीचं राजकारण थांबवा. मी काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असून काँग्रेसने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला आहे. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला आहे. परंतु काही जण माझ्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचे काम करता आहेत.असं विजय वडेवट्टीवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT