Maharashtra Politics  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राज्याचं विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार? या तीन नावांची जोरदार चर्चा

Latest Political News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज युती सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

Chandrakant Jagtap

Maharashtra Political Leaders Of Opposition: राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज युती सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांना राष्ट्रवादीतील 35 आमदारांचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज सकाळीच अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीची आपल्याला कल्पना नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दरम्यान राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीत फूट पडली अशी प्रतिक्रिया साम टीव्हीला दिली आहे.

विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?

राष्ट्रवादीतील 35 आमदारांचा जर अजित पवार यांना पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादीत फुट पडली तर विरोधी पक्षनेतेपद देखील राष्ट्रवादीकडून जाण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीचे विधानसभेत 54 आमदार आहेत. त्यापैकी 35 आमदार अजित दादांसोबत गेल्यास उर्वरित 19 आमदार शरद पवार यांच्यासोबत आहेत असे चित्र आहे. दुसरीकडे ठाकरे गटाकडे विधानसभेत 16 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे 44 आमदार आहे.

काँग्रेसने केला विरोधी पक्षनेते पदावर दावा

काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी देखील विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. काकासाहेब कुलकर्णी यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच विरोधी पक्ष नेते होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात लोकशाही संपावण्याचा विडा भाजपने उचलेला आहे अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेतेपदासाठी ही 3 नावं चर्चेत

विधानसभेतील सध्याचं संख्याबळ पाहिल्यास काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद देखील काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसमधील तीन नेत्यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. यात जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वरमध्ये ऑनलाईन दर्शन पासमध्ये छेडछाड करून दर्शनाला जाण्याचा प्रयत्न

Operation Mahadev : लष्कराचं 'ऑपरेशन महादेव' फत्ते; ३ दहशतवादी ठार, पहलगाम हल्ल्याचे संशयित असण्याची शक्यता

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

SCROLL FOR NEXT