MP Amol Kolhe  saam tv
महाराष्ट्र

खासदार अमोल कोल्हेंना कुणाची ऑफर? ठाकरेंनंतर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फुटणार?

Maharashtra Politics: ठाकरेसेनेतील बंडखोरीनंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही बंडखोरी होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.आणि त्याला कारण ठरलयं. खासदार अमोल कोल्हेंनी केलेलं एक विधान. कोल्हेंना कुणी ऑफर दिलीय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

ऐकलतं. हे आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे पुणे- नाशिक रेल्वेच्या संदर्भात बोलताना खासदार कोल्हेंनी महायुतीची ऑफर आल्यास विचारू करू, असं विधान केलं. आणि ठाकरेंनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदारही फुटणार असल्याची चर्चा रंगलीय.

आधीच डिलिमिटेशन विधेयकाच्या मंजुरीसाठी सत्ताधाऱ्यांकडून फोडाफोडीचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यात अमोल कोल्हेंच्या या विधानानंतर एकच खळबळ माजली.राऊतांनी कोल्हेंचं विधान दुर्देवी असल्याचं म्हटलं. तर कोल्हेंनी शरद पवारांसोबत राहणार असल्याचं स्पष्ट केलं.

दुसरीकडे ऑफर आली तर कोल्हेंनी जायचं ठरवलयं. त्यामुळे राष्ट्रवादीतही बदलाचे वारे वाहतायत, असं विधान संजय शिरसाटांनी केलयं. ठाकरेंच्या खासदारांच्या बंडखोरीनंतर शरद पवारांचे खासदारही फुटणार असल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरु झाली होती. त्त्यात कोल्हेंनी विधान केल्यामुळे आता या चर्चेला अधिकच जोर आलाय. त्यामुळे भविष्यात पवारांचे खासदार पक्षाशी एकनिष्ठ राहणार की विकासकामांच्या नावाखाली बंडखोरी करत सत्ताधाऱ्यांच्या गोटात सामील होणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT