Amol Kolhe On Devendra Fadnavis Saam Tv
महाराष्ट्र

Amol Kolhe On Devendra Fadnavis: 'दिल्लीचे नेते फडणवीसांचे पंख छाटतात', अमोल कोल्हेंनी डिवचलं

Amol Kolhe Criticized Devendra Fadnavis: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप हायकमांड महायुतीची धुरा शिंदेंच्या खांद्यावर सोपवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यावरूनच अमोल कोल्हे यांनी फडणवीसांवर टीका केली.

Priya More

रोहिदास गाडगे, पुणे

'दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होतोय', असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. या वक्तव्याद्वारे अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे.

भाजप हायकमांड महायुतीची धुरा शिंदेंच्या खांद्यावर सोपवणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. महायुती शिंदेच्या नेतृत्वामध्ये पुढे जाणार असल्याची माहिती मिळत आहे. यावरूनच अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

अमोल कोल्हे यांचा आज मंचर येथे जनता दरबार भरला होता. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्र सरकारसोबत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची विधानसभा निवडणूक लढवली जाणार होती. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांचा पंख छाटण्याचा प्रकार दिल्लीच्या नेत्यांकडून होत असेल.' असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचले आहे.

'मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडीवर टीका करुन संभ्रम निर्माण करण्यापेक्षा सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा सक्षम तोडगा काढा.' असा टोमणा अमोल कोल्हे यांनी यावेळी सरकारला लगावला. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावात बदल करण्यात येणार आहे. यावरुनही अमोल कोल्हेंनी राज्यसरकार टीका केली. 'भाजपाच्या सरकारमध्ये नावे बदलणे हेच दिसतंय. नावे बदलून सुद्धा महानगरामध्ये पाणी साचणे थांबत नाही. विमानतळाची छत कोसळणे थांबत नाही, रेल्वेचे अपघात थांबत नाहीत. नावे बदलण्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळणे महत्वाचे आहे.', असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT