Gulabrao Patil Statement Saam Tv
महाराष्ट्र

Gulabrao Patil : उज्वल निकमांचा ठाकरेंना फोन आणि मी मंत्री झालो, गुलाबराव पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

Gulabrao Patil Statement : जळगाव येथे झालेल्या ॲड. उज्ज्वल निकम यांच्या सत्कारप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निकम यांच्या एका फोनमुळे मंत्री झाल्याचा मोठा गौप्यस्फोट केला.

Alisha Khedekar

  • उज्ज्वल निकम यांच्या सत्कारप्रसंगी जळगावमध्ये भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

  • कार्यक्रमात गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली.

  • पाटील यांनी निकम यांच्या एका फोन कॉलचा उल्लेख करून मजेशीर किस्सा उलगडला.

  • महाजन यांनी भाजप हिऱ्यांची पारख करतो असे सांगून निकम यांच्या नियुक्तीचे कौतुक केले.

जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ॲड. उज्ज्वल निकम यांच्या सत्कारप्रसंगी रंगलेल्या मंत्र्यांच्या शब्दयुद्धाने उपस्थितांचे लक्ष वेधले. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात झालेल्या संवादातून राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली.जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या भाषणांमधून नेहमीच फटकेबाजी करताना दिसून येतात.यावेळेसही त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.निकम यांनी माझ्यासाठी तेव्हा एक फोन केल्यामुळे काय घडले होते, याचा गौप्यस्फोट करून त्यांनी खळबळ उडवून दिली.

ज्येष्ठ विधीतज्ञ राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांचे रविवारी सायंकाळी जळगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर उज्ज्वल निकम पहिल्यांदाच जळगाव मध्ये आले होते. या विशेष प्रसंगी जळगाव शहरातील नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी ॲड. निकम यांच्या न्यायिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची प्रशंसा केली आणि राज्यसभेतील त्यांच्याकडून अपेक्षित भुमिकेचा उल्लेख केला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावळ यांनीही मनोगत व्यक्त केले.

गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात २०१६ मधील एक आठवण सांगत गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी पहिल्याच यादीत आपले नाव वगळण्यात आले होते, तेव्हा गिरीश महाजन मंत्री होते, पण त्यांनी कोणताही "वशिला" लावला नव्हता. पुढे त्यांनी सांगितले की, त्याच काळात त्यांनी अॅड. उज्ज्वल निकम यांना भेट दिली होती आणि निकम यांनी त्यांच्या समर्थनार्थ एक फोन केल्यावरच त्यांना सहकार मंत्रिपदाची संधी मिळाली होती. या आठवणीने वातावरणात हास्याची लहर पसरली.

या प्रसंगी गिरीश महाजन यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आणि भाजप पक्षातील मूल्यांचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की, ॲड. उज्ज्वल निकम यांना २०१९ मध्ये उमेदवारी देण्याचा विचार होता, परंतु ती शक्यता थोडक्यात हुकली. मात्र, २०२४ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि जरी ते कमी मतांनी हरले, तरी आता राष्ट्रपतींनी त्यांची थेट नियुक्ती केल्याने हे खरोखरच गौरवास्पद आहे.

महाजन यांनी भाजप पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, हा पक्ष नेहमीच हिऱ्यांची पारख करतो. जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते असतानाही निकम यांच्यासारख्या व्यक्तीला संधी देण्यात आली, यावरून पक्षाचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. आता निकम मोदी-शहा यांच्या भवनात असतील, त्यामुळे थोडं "घाबरून" राहावं लागेल, असा उपरोधिक सूरही त्यांच्या भाषणात दिसून आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : शाईऐवजी स्केच पेनचा वापर; मनसे उमेदवाराचा खळबळजनक आरोप

Dhule Tourism : थंडीत अजूनही ट्रेकिंगला गेला नाहीत? मग 'हे' ठिकाण तुमच्यासाठी ठरेल खास

Municipal Election : मोठी बातमी! मतदार यादीत घोळ, मंत्र्यांचेच नाव मतदार यादीत नाही, नवी मुंबईमध्ये गोंधळ

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी बळीराजाच्या खात्यात ₹२००० जमा होण्याची शक्यता

मोठी बातमी! मुंबईत पहिला दुबार मतदार सापडला, मनसे उमेदवारासमोर भंडाफोड, वाचा नेमकं झालं काय?

SCROLL FOR NEXT