Maharashtra Politics x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का, बड्या नेत्याने भाजपचे 'कमळ' हाती घेतले

Maharashtra Political News : शिवसेना ठाकरे गटाला कोकणात धक्का बसला आहे. वैभववाडीतील ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Yash Shirke

  • ठाकरे गटाचे वैभववाडी तालुका अध्यक्ष मंगेश लोके यांचा भाजपामध्ये प्रवेश.

  • पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ओरोस येथील भाजपच्या मुख्य कार्यालयात प्रवेश.

  • मंगेश लोके यांच्या सोबत पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी केला प्रवेश.

विनायक वंजारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. दिवाळीत जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपालिका यांच्या निवडणुका होतील असे संकेत आहेत. या पहिल्या टप्प्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील असे म्हटले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणी सुरु असताना ठाकरे गटाला सिंधुदुर्गमध्ये धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे सिंधुदुर्गमधील वैभववाडीचे तालुका अध्यक्ष मंगेश लोके यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये मंगेश लोके यांचा पक्षप्रवेश झाला आहे. हा उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सिंधुदुर्गमधील ओरोस येथील भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालयामध्ये मंगेश लोके यांचा पक्षप्रवेश झाल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये मंगेश लोके यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगेश लोके यांचा भारतीय जनता पक्षातील पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे वैभवाडी तालुक्यात आणि सिंधुदुर्गमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. याचा परिणाम निवडणुकांमध्ये होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेमुळे कोकणात ठाकरे गटाचे टेन्शन वाढले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या बंडखोराला घरात कोंडलं! माघारीची भीती, समर्थकांची रणनीती

Maharashtra Live News Update: नंदूरबारमध्ये मेंढपाळ आक्रमक

Saturday Horoscope: 4 राशींचं नशीब पालटणारा! काहींची संकट होणार दूर, वाचा शनिवारचे राशीभविष्य

मोदी-शाहांना हायकोर्टानं ठोठावली शिक्षा? पंतप्रधान मोदी-शाह जेलमध्ये जाणार?

Purnima Birth: पौर्णिमेला जन्मलेले मुलं कशी असतात?

SCROLL FOR NEXT