महाराष्ट्र

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

MVM 23 MLA Absent In Meeting: राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला उत आलेला असताना महाविकास आघाडीच्या एकीवर उद्धव ठाकरेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. दुसरीकडे मविआच्या बैठकीला तब्बल 23 आमदारांची दांडी होती. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांचं टेन्शन वाढलंय. पाहूया एक खास रिपोर्ट.

Girish Nikam

विधान परीषद निवडणूक आणि ऑपरेशन टायगरमुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या निवडणुकीत मविआला एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसच्या काही उमेदवारांनी तर ऐनवेळी माघार घेऊन पक्षाला तोंडघशी पाडलंय. तर तिकडे ठाकरे सेनेच्या सहा खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेते प्रवेश केलाय. विरोधक बॅकफूटवर गेलेले असतानाच महाविकास आघाडीची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मविआच्या एकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. रस्त्यावर आणि विधीमंडळातही तीन्ही पक्षांची एकजुट हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ठाकरेंनी नेमके काय सवाल उपस्थित केलेत पाहूया.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मविआ म्हणून आपण खरंच एकत्र आहोत?

आपण सभागृहात एकत्र आहोत का?

मविआ म्हणून आपण एकत्रित मुद्दे मांडतो?

आपण सगळ्यांनी एकी दाखवली पाहिजे

राज्यभरातील सभा, बैठका, आंदोलनंसुद्धा एकत्रित करायला हवी

केवळ कागदावरच मविआ आहे का ? असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. कारण फोडाफोडीचं राजकारणाला उत आलेला असताना आणि सहा खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विधानसभा आणि विधान परिषदेच्या एकूण 60 आमदारांपैकी 37 आमदार उपस्थित होते. विरोधी पक्षांचे 23 आमदार अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आलंय. त्यालील 16 आमदारांची नावे साम टीव्हीच्या हाती आली आहेत. त्यामध्ये त्यालील 16 आमदारांची नावे साम टीव्हीच्या हाती आली आहेत.

दरम्यान, बैठकीला गैरहजर असणाऱ्या आमदारांमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि जयंत पाटलांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश असल्यानं अनेकांच्या भूवया उंचावल्यात. मात्र या नेत्यांनी बैठकीला गैरहजर राहण्याचं कारण सांगितलं आहे. ठाकरेसेनेचे खासदार फुटल्यानंतर मविआतील इतर पक्षाचेही आमदार, नगरसेवक फुटण्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र आमचा एकही आमदार फुटणार नाही, असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केलाय.

सत्ताधाऱ्यांच्या फोडाफोडीच्या राजकारणात आता विरोधकांची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे. आपले आमदार तर सांभाळावे लागणार आहेतच दुसरीकडे महागाई, गुन्हेगारी, बेरोजगारी या मुद्यांवरुन विरोधकांना रान उठवावं लागणार आहे. उद्धव ठाकरेंनी सुनावल्यानंतर तरी मविआतल्या तिनही पक्षांची एकजूट रस्त्यावर दिसणार का ? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

SCROLL FOR NEXT