Aditya Thackeray  Saam Tv News
महाराष्ट्र

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंकडून फिल्डिंग, विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आग्रही

Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. ते यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More

Summary -

  • आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत

  • भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू होती

  • आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता

  • भाजप आणि सरकार आदित्य ठाकरे यांच्या नावाला पाठिंबा देतात की नाही हे पाहावे लागेल

सूरज मसूरकर, मुंबई

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरूवात होणार आहे. या अधिवशेनासाठी नागपुरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच विरोधीपक्षनेते पदाबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळावे यासाठी उध्दव ठाकरेंकडून प्रयत्न सुरू आहेत. आज ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

विरोधीपक्षनेते पद हे रिकामं होतं. त्यामुळे महाविकास आघाडी विरोधीपक्षनेते पद कुणाला देणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. पण आता हे पद आदित्य ठाकरेंना मिळावे यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. आदित्य ठाकरे यांच्याकडे गटनेतेपद आहे. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळू शकतं. आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद मिळालं तर आक्रमक पध्दतीने ते प्रचार करतील आणि त्यांना अनुभव येईल.

महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाची चर्चा होती. कारण भास्कर जाधव हे अनुभवी नेते आहेत. त्यामुळे हे पद त्यांच्याकडे जावे असे बोलले जात होते. पण आता भास्कर जाधव यांना बाजूला सारून उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंसाठी मुख्यमंत्र्यांकडे शब्द टाकणार आहेत असे सांगितले जात आहे. येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतील.

भास्कर जाधव यांना लॉलीपॉप दाखवल्याची चर्चा सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू आहे. भास्कर जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून आमदार आहेत. ते अनुभवी आहेत. त्यांनाच विरोधीपक्षनेते पद मिळणार असे बोलले जात आहे. पण आता त्यांचे नाव बाजूला करून आदित्य ठाकरे यांचे नाव समोर येत आहे. त्यामुळे भास्कर जाधव नाराज होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भास्कर जाधव यांच्यासारख्या आक्रमक नेत्याऐवजी आदित्य ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव विरोधी पक्षनेते पदासाठी केला जात असल्यामुळे भाजप आणि सरकार आदित्य यांच्या नावाला पसंती देतात की नाही? हे लवकरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT