Uddhav Thackeray addressing a public gathering while highlighting the issue of Marathi identity in Mumbai. Saam Tv
महाराष्ट्र

Uddhav Thackeray: मराठी माणसा, चुकशील तर संपशील! उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं

Uddhav Thackeray Statement: मनोमिलनाचं गीत गात असतानाच उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाचं हित नेमकं कशात आहे. ते सांगितलंय. मात्र उद्धव ठाकरेंचं वक्तव्य नेमकं काय आहे आणि ठाकरेंच्या भूमिकेवर महायुतीचे नेते का तुटून पडलेत. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Jadhav

  • उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानं मराठी अस्मितेचा मुद्दा ऐरणीवर

  • मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंचा अजेंडा स्पष्ट

  • महायुतीकडून ठाकरे गटावर तीव्र टीका

उद्धव ठाकरेंच्या याचं विधानानं मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीचा अजेंडा ठरल्याचं स्पष्ट होतयं.युतीच्या घोषणेवेळी उद्धव ठाकरेंनी मराठी मतदारांना भावनिक साद घालत. मराठी माणसाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. तर राज ठाकरेंनीही मुंबईचा महापौर मराठी होणार असल्याचं सांगून मराठीच्या मुद्द्याला पुन्हा हायलाईट केलयं.

तब्बल पाच महिन्यापूर्वी हिंदीसक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र आले. सरकारच्या हिंदीसक्तीच्या मुद्द्याला विरोध करून मराठीचा मुद्दा ठाकरेंनी ऐरणीवर आणला.आणि त्यानंतर सुरु झाली ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा.आता महापालिकेआधी युतीची घोषणा करून ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उपस्थित केल्यानं विरोधकही आक्रमक झालेत. ठाकरेंनी मराठीसाठी काय केलं? असा खोचक प्रश्न विरोधकांनी केलाय.

शिवसेनेची स्थापनाच मुळी मराठी माणसासाठी झाली. भाजप- शिवसेना युतीच्या काळात मराठीऐवजी हिंदुत्वाचाच मुद्दा प्रखरतेनं मांडण्यात शिवसेना वरचढ ठरली. त्यात राज ठाकरेंनी वर्षभरापूर्वी हिंदुत्वाची शाल पांघरूण मराठीचा मुद्द्याला साईडलाईन केलं होतं. मात्र आता मुंबईच्या सत्तेसाठी मराठी माणसाच्या अस्तित्वाचा नारा देऊन जरी ठाकरे बंधू एकत्र आले असले.

तरी मुंबई महापालिकेची निवडणुक ठाकरेंसाठीच अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. आता या अस्तित्वाच्या लढाईत मराठी माणुस ठाकरेंच्या पाठिशी उभा राहतो का? भाजप मराठीच्या मुद्द्याला वळण्यासाठी कोणत्या अस्त्राचा वापर करते... हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : पालक-चिकन खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितली नेमकी चूक

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

BJP Leader Shot Dead: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, दुचाकीवरून आलेल्या चौघांनी घरासमोरच धाडधाड गोळ्या झाडल्या

Accident : चालकाला डुलकी लागली अन् कार पुलावरून कोसळली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर

Silver Price: २० वर्षांपूर्वी 1KG चांदीची किंमत किती होती? १५०० टक्क्यांनी झाली वाढ

SCROLL FOR NEXT