Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : 'मी मंत्री होणार, मंत्री झालो नाहीतर...' ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Maharashtra Political News : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी पक्षाच्या मेळाव्यामध्ये लवकरच आपलं सरकार येणार, मी मंत्री होणार असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

Yash Shirke

Maharashtra : 'लवकरच आपलं सरकार येणार, मी मंत्री होणार' असे वक्तव्य ठाकरेसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. मी मंत्री झालो नाही, तर हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नक्की होईन असा दावाही जाधव यांनी केला आहे. भास्कर जाधवांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना सुरुवात झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्याआधी महाविकास आघाडी त्यातही शिवसेना ठाकरे गटाला गळती सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तळ कोकणामधील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गळती थांबवण्याच्या उद्देशाने भास्कर जाधव यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

या मेळाव्यामध्ये भास्कर जाधव यांनी 'लवकरच राज्यात आपले सरकार येणार आहे, मी मंत्री होणार आहे' असे वक्तव्य केले. 'विधानसभेच्या अध्यक्षाला कोण-काही बोलतं का?' या प्रश्नावर 'तुमचा भास्कर जाधव बोलला की नाही?' असे जाधव म्हणाले. या मेळाव्यात त्यांनी रामदास कदम यांच्यावर टीका केली. रामदास कदम यांचा उल्लेख 'बामदास छमछम' असा केला. ठाकरे गटाच्या मेळाव्यामध्ये भास्कर जाधव भावुक देखील झाले.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि जिल्हा परिषद सदस्या नेत्रा ठाकूर यांनी भास्कर जाधव यांची साथ सोडून शिंदेगटात प्रवेश केला. लागोपाठ कोकणात ठाकरे गटाला गळती सुरु आहे. या एकूण परिस्थितीवर भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी भाषणामध्ये प्रतिक्रिया दिली. 'आपल्यासोबत घातच झाला नाही, तर विश्वासघात झालाय', असे विक्रांत जाधव म्हणाले. विक्रांत यांचे वक्तव्य ऐकताच भास्कर जाधवांचा कंठ दाटून आले. त्यांनी सर्वांसमोर आपले डोळे पुसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac predictions: आज कोणाचा दिवस उजळणार? जाणून घ्या १० जानेवारीचं पंचांग आणि राशीविशेष

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

तुमच्या ऑनलाईन शॉपिंगवर ITची नजर? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

मराठी-हिंदी संघर्ष, मुस्लीम ठरणार किंगमेकर? मुंबईची निवडणूक पुन्हा भाषा आणि प्रांतावर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT