Speculation rises over Thackeray camp candidates for Maharashtra Legislative Council seat saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: विधान परिषदेत मोठा ट्विस्ट; उद्धव ठाकरे नाही तर 'या' दोन नेत्यांच्या नावाची जोरदार चर्चा, कोणाला मिळणार संधी?

Maharashtra Legislative Council: विधान परिषदेच्या जागेसाठी उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे यांची नावे समोर येत आहेत.

Bharat Jadhav

  • विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीला एक जागा

  • ठाकरे गटात उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा

  • अंबादास दानवे आणि सुषमा अंधारे आघाडीवर

विधान परिषदेच्या रिक्त ९ जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला आली आहे. या एका जागेसाठी ठाकरे शिवसेनेकडून माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची चर्चा आहे. दरम्यान उद्धव ठाकरे सुद्धा विधान परिषदेतून निवृत्त झाले आहेत.

उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाहीये. परंतु उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक असतील तर आघाडीकडून कोणीही उमेदवार देणार नाहीत. असं कॉग्रेसनं म्हटलंय. तरीही या एका जागेसाठी ठाकरे गटातून चार ते पाच नेते इच्छुक आहेत. यात माजी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक, पक्षाचे सचिव सुरज चव्हाण यांच्यासह अंबादास दानवे व सुषमा अंधारे यांची नावे चर्चेत आहेत.

अंबादास दानवे हे काही महिन्यांपूर्वी विधान परिषदेतून निवृत्त झाले आहेत. विरोधी पक्षनेते असताना दानवेंनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणत सरकारवर हल्लाबोल केला होता. आक्रमक चेहरा म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते. सुषमा अंधारे यांचेही नाव विधान परिषदेच्या शर्यतीत आहे. पुणे, सातारा येथील ड्रग्ज प्रकरण, महिला अत्याचार, खरात प्रकरणांसह अनेक प्रकरणांत अंधारे यांनी सरकारला जेरीस आणलं होतं.

दरम्यान उद्धव ठाकरे विधान परिषदेचे उमेदवार असतील तर काँग्रेस त्यांना पाठिंबा देईल असं सांगितलं जात आहे. पण दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याची आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूकची रंगत वाढली आहे. दुसरीकडे ठाकरे गटातून इतर नेत्यांची नावे चर्चेत आहेत. दुसरीकडे ठाकरे स्वत: उमेदवार असतील तरच पाठिंबा देणार असल्याची भूमिका काँग्रेसने स्पष्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT