Maharashtra Political News: Saamtv
महाराष्ट्र

BJP OBC Cell Meeting: 'ओबीसी योजनांच्या अटी व शर्थी शिथिल करणार..' भाजप ओबीसी मोर्चाच्या बैठकीत मोठा निर्णय

Maharashtra Political News: भाजप ओबीसी मोर्चाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.

Gangappa Pujari

सुरज मासुरकर, प्रतिनिधी

OBC Morcha Meeting:

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा बांधवांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीला ओबीसी बांधवांचा विरोध असून सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. यां संदर्भात राज्यातील भाजप ओबीसी सेलची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.

राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन ओबीसी बांधवही आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भाजप ओबीसी सेलची (BJP OBC Cell) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) आणि ओबीसी समाजातील बडे नेते उपस्थित होते.

या बैठकीत ओबीसी ओबीसी योजनांतील अटी व शर्थी शिथिल करण्याबद्दल निर्णय झाल्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी सांगितले आहे. तसेच या बैठकीमध्ये ओबीसी समाजासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजना (Vishwakarma Yojana) तळागाळात राबवण्याबद्दल निर्णय झाला.

तसेच प्रत्येक विधानसभेत १ हजार विश्वकर्मा लाभार्थी तयार करणार येणाऱ्याचा निर्णयही या बैठकीत झाला. या योजनेअंतर्गत राज्यात ३ लाख लाभार्थी तयार करणार येणार असून प्रत्येक लाभार्थ्याला १ ते ३ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देणार मिळणार आहे. तसेच या योजनेतून तब्बल ३०० कोटी रुपयांचा निधी वाटण्याचे भाजपचे नियोजन आहे. पुढील एका महिन्यात ही योजना राबवण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई–बडोदा द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात

Marathi compulsory: 'आमच्या भाषेच्या विरोधात रस्त्यावर येत असाल, तर…'; अमराठी रिक्षाचालकांवर संतापला आणखी एक मराठी अभिनेता

Periods Care : पीरियड्समध्ये करा 'हा' एकच रामबाण उपाय, त्वचेवर खाज अन् पुरळ येणारच नाही

Marathi Actress Harassment: त्याने अचानक मला पकडलं; मुंबईच्या रस्त्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत घडला भयंकर प्रकार

High Blood Pressure : वजन वाढले, चक्कर आली; असू शकतो हाय BP चा धोका; काय आहेत ५ मुख्य लक्षणे?

SCROLL FOR NEXT