Maharashtra Politics  x
महाराष्ट्र

Maharashtra Politics : ठाण्यात राष्ट्रवादीला खिंडार, एकनाथ शिंदेंचा शरद पवार गटाला धक्का

Maharashtra Political News : ठाण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Yash Shirke

विकास काटे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. निवडणुकीबाबत लवकरच घोषणा होणार असल्याचे म्हटले जात आहे. निवडणुकीच्या पूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला धक्का बसला आहे. कळवा येथील असंख्य कार्यकर्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कळवा मुंब्रा मतदार संघाच्या कळवा येथून अनेक कार्यकर्ते शिंदेसेनेत जाणार आहे. ज्येष्ठ नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या माध्यमातून पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रम येथे भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

पक्षप्रवेशामुळे शरद पवार गट खासकरुन जितेंद्र आव्हाड यांना धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. यानंतर आता स्थानिक पातळीवरील असंख्य महिला कार्यकर्त्या आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. आज जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला. यामुळे जळगावमध्ये काँग्रेसला धक्का बसल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

Maharashtra News Live Update: जेईई मेन परिक्षेच्या तारखा जाहीर, २२ जानेवारी रोजी होणार परीक्षा

राज्यसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार; १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार, कोणाला मिळणार संधी?

Shocking News: आश्रमशाळेत विद्यार्थिनीसोबत भयंकर घडलं, संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

Shiv Sena Case Live : शिवसेना कुणाची? शिंदे गटाचा जोरदार युक्तिवाद; वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT