Uddhav Thackeray as speculation rises over a possible new split within Shiv Sena amid opposition leader controversy. Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Maharashtra Politics: विरोधी पक्षनेतेपदाच्या वादावरून हिवाळी अधिवेशन तापलेलं असतानाच ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा फुटण्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. कारण भाजपनं विरोधी पक्षनेतेपदावरून मोठी खेळी खेळल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. नेमकी काय आहे ही खेळी ? आणि कुणाच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडणार? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Suprim Maskar

  • विरोधी पक्षनेते पदावरून हिवाळी अधिवेशन तापलं.

  • भाजपनं या मुद्यावर मोठी राजकीय खेळी केल्याची चर्चा.

  • ठाकरे गटात पुन्हा फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विरोधी पक्षनेताचं नसलेलं हे पहिलंच अधिवेशन. महायुती सरकार सत्तेवर येऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही विधानसभा आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेता पद मिळालेलं नाहीय. मात्र या अधिवेशनात विरोधी पक्षनेते पद देण्यासाठी भाजपनंच नवी खेळी रचलीय. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभेचं तर ठाकरेसेनेच्या अनिल परब यांना विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद मिळावं यासाठी सहकार्याची ऑफर भाजपनं दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मात्र भाजपची ही ऑफर महाविकास आघाडीत फूट पाडण्यासाठी आहे का? असाही सवाल निर्माण झालाय. कारण यावर महाविकास आघाडीनं घेतलेली भूमिका.

ठाकरेसेनेच्या भास्कर जाधव यांना विधानसभेचे तर काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे अशी महाविकास आघाडीची मागणी आहे. त्यातच भास्कर जाधव यांच्यासाठी ठाकरेसेनेनं तर सतेज पाटलांसाठी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींना पत्रदेखील दिलयं. जाधवांना विरोधीपक्षपद न दिल्यास जाधव ठाकरेंना सोडचिठ्ठी देतील आणि भाजपा बरोबर चुल मांडतील अशी शक्यता आहे . असं झाल्यास ठाकरेची सेना पुन्हा फुटेल. दरम्यान आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेता करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फिल्डिंग लावायला सुरु केल्याचा दावा शिंदेसेना करते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिक्षण उपसंचालक प्रवीण अहिरे यांच्या निलंबनाची मागणी, विधानपरिषदेत लक्षवेधी

Crime : लाथाबुक्क्यांनी मारलं, चाकूने वार केला, अहिल्यानगरमध्ये पैशांच्या वादातून तरुणाची हत्या

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या कामाची बातमी! eKYC करतानाची ही चूक पडेल महागात; ₹१५०० बंद होणार

New Highway: महाराष्ट्राला मिळणार आणखी एक महामार्ग, कल्याण ते लातूर प्रवास फक्त ४ तासांत; काय आहे सरकारचा प्लान?

"बाबुराव को गुस्सा क्यू आता है"? पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्याचा आणखी एक व्हिडिओ अन् पुन्हा गुन्हा, वाचा प्रकरण

SCROLL FOR NEXT