Uddhav Thackeray addressing party workers ahead of the crucial Mumbai civic elections 2025. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई? मुंबई महापालिका कोण जिंकणार?

BMC Elections 2025: मुंबई महापालिका निव़डणुकीसाठी प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ठाकरेसेनेनं कंबर कसलीय. कारण पालिका निवडणुक उद्धव ठाकरेंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

Omkar Sonawane

मुंबई महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आणि ठाकरेसेनेसह इतर पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या बैठकी घेण्यास सुरुवात केली. मात्र 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्तेत असणाऱ्या शिवसेनेत फुटीनंतर महापालिका कोण जिंकणार याकडे अनेकाचं लक्ष लागलयं. मात्र मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरेसेनेसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे..

शिंदेसेनेने गेल्या दोन वर्षात शिवसेनेतील 103 हून अधिक माजी नगरसेवक गळाला लावलेत. 236 प्रभागांची संख्या असती तर नव्या प्रभागात पारंपारिक मतदार ठाकरेसेनेकडे वळला असता. मात्र आता जुन्या रचनेमुळे नव्याने उमेदवार उभे करावे लागतील. माजी नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यानं संघटनशक्ती कमकुवत झालीय. पालिका क्षेत्रात भाजपची ताकद वाढलेली पाहायला मिळतेय. त्यामुळे शिंदेसेना- भाजपनं पालिकेत बहुमत मिळवल्यास याचा परिणाम 2029 च्या विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता. ठाकरे बंधूंचं पॅनेल बेस्ट पतपेढी निवडणुकीत पराभूत झाल्यानं कामगार वर्गावरील पकड कमी झाल्याचं उघड.

महापालिका निवडणुकीआधी ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा वारंवार केली जातेय. मात्र अद्याप मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. ठाकरेसेनेसाठी पालिका निवडणुक आरपारची लढाई असणार आहे. आता पालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी ठाकरेसेना कोणती रणनिती आखते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुमशी गावातील महिला सरपंचाच्या घरासमोर राडा

Ashok Kharat: खरात प्रकरणामुळे अजित पवार गटातील आणखी एक महिला नेत्या विरोधकांच्या रडारवर; राजीनाम्याची केली मागणी

Elphistone Bridge: मध्य रेल्वेवर ६ दिवस मेगा ब्लॉक; लोकलचं वेळापत्रक बदलणार; तुमच्यावर काय परिणाम होणार?

IPL 2026: पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; चेन्नईची थेट सहाव्या स्थानावर, पहिल्या नंबरवर कोण?

Haldi Yellow Saree Designs: हळदीला नव्या नवरीने ट्राय करा या सुंदर ट्रेंडी पिवळ्या साड्या, पाहा ७ युनिक डिझाईन्स

SCROLL FOR NEXT