SANJAY RAUT WARNS REBEL MPS: ‘NOW THERE WILL BE A SHOWDOWN’, THACKERAY GROUP TO BEGIN LEGAL FIGHT  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आता राडा होणारच, राज्य गप्प बसणार नाही; संजय राऊतांचा फुटीर खासदारांना इशारा

Sanjay Raut Warn MPs : ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर संजय राऊत आक्रमक झालेत. गद्दार खासदारांविरोधात कायदेशीर लढाई सुरू केल्याचा इशारा त्यांनी दिलाय.

Bharat Jadhav

  • फुटीर ६ खासदारांविरोधात ठाकरे गटाने कायदेशीर लढाई सुरू केल्याचा इशारा.

  • संजय राऊत म्हणाले, "राज्य आता गप्प बसणार नाही, राडा होणारच."

  • उद्धव ठाकरेंच्या नावावर निवडून येऊन विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप.

खासदारांनी आमच्या समोर शपथ घेतल्या, कोणी आई, कोणी मुलीची तर कोणी साईबाबांची शपथ घेतली. पण अर्ध्या रात्री गायब झाले. आता गद्दार खासदारांना सोडणार, राज्य आता गप्प बसणार नाही. आम्ही आता कायदेशीर लढाई सुरू केली आहे, असा गंभीर इशारा खासदार संजय राऊत यांनी फुटीर खासदारांना दिला आहे.

ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर आज संजय राऊत, गटनेते अरविंद सावंत, अनिल देसाई, खासदार राजाभाऊ वाजे यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. जुन्या स्टाईलनं फुटीर नेत्यांना खडेबोल सुनावले. जे खासदार उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर आणि मशाल चिन्ह्यावर निवडणून आले त्यांना अशा बेईमानी करण्याचा अधिकार नाही. त्यांना असं सोडून जाणं ते सोपं नाहीये. उद्धव ठकारेंना सोडून जाणाऱ्यांच्या रक्तात बेईनामी असल्याचं राऊत म्हणालेत.

एका खासदारान तीन वेळा साईबाबांची शपथ घेतली. एकानं आईची दुसऱ्यानं मुलीची शपथ घेतली आणि निम्म्या रात्रीच गायब झाले. एका महत्त्वाच्या व्यक्तीनं फोन करून मला महाराष्ट्रातील खासदारांची विक्री होत असल्याचं सांगितलं. प्रत्येकाला ५०-५० कोटी रुपये देण्यात आलेत. त्यातील अॅडव्हन्स म्हणून १५ कोटी रुपये देण्यात आले. त्यानंतर चाटर्ड प्लेन दिल्ला नेण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोकलमधून ट्रॅकवर पडलेल्या 24 वर्षीय तरुणीचे रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Women Success Story : पतीची साथ सुटली, वडिलांची सावली हरपली; मुलीसाठी लढली अन् पालघर जिल्हा परिषदेत शिक्षिका म्हणून निवड

Chivda Vs Murmura: चिवडा की मुरमुरा, वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट?

परळी ते शेगाव, मालेगाव ते म्हाडा अन् रामटेक ते बारामती; राज्यातील दुष्काळाची स्थिती काय? सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Purandar Fort : ४,४७२ फूट उंचीवर वसलेला भव्य पुरंदर किल्ला, गडाबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहितेय का?

SCROLL FOR NEXT