Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: चूक उद्धव ठाकरेंचीच! ठाकरे गटाच्या खासदाराने व्यक्त केली नाराजी, म्हणाले; 'मुख्यमंत्री व्हायचे होते तर...'

Thackeray Group Leader: आदित्य ठाकरेंना मंत्री केल्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली असल्याचे" देखील ते म्हणाले...

संदीप नागरे

Hingoli News: शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी विविध अभियानातून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. सध्या ठाकरे गटाकडून शिवगर्जना अभियान राबवले जात आहे. या शिवगर्जना सभेत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी उद्धव ठाकरेंचे खरच चुकले असे म्हणत थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)

याबाबत अधिक माहिती अशी की, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने राज्यभरात शिवगर्जना अभियान सुरू आहे. आज हिंगोलीच्या औंढा शहरात या अभियानाअंतर्गत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत परभणीचे खासदार बंडु जाधव यांनी उद्धव ठाकरेंबद्दल नाराजी बोलून दाखवली आहे. "उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तर त्यांनी मुलाला मंत्री करायला नको होतं, आणि मुलाला मंत्री करायचं होतं तर स्वतः मुख्यमंत्री व्हायला नको होतं," असे विधान त्यांनी केले आहे.

तसेच याबद्दल पुढे बोलताना "दोघेही मंत्री झाल्यामुळे पक्ष संघटनेकडे लक्ष देता आले नाही आणि गद्दारांना संधी मिळाली असल्याचे विधान खासदार बंडू जाधव यांनी केले आहे. तसेच आदित्य ठाकरेंना मंत्री केल्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली असल्याचे" देखील यावेळी खासदार बंडू जाधव म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसेना पक्ष (Shivsena) आणि चिन्हाचा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची उद्या जाहीर सभा होत आहे. रत्नागिरीमधील खेडमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे उद्या कोणावर हल्लाबोल करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोड ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT