Uddhav-Raj Thackeray Yuti saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र? कुणाकुणाच्या पोटात गोळा?

Uddhav-Raj Thackeray Yuti: ठाकरे बंधू एकत्र येण्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. याच पार्श्वभूमिवर ठाकरे गटाकडून एक नवं पोस्टर समोर आलंय. त्यात पुन्हा एकदा मनसेला साद घालण्यात आली आहे. पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राज ठाकरेंनी साद घातली आणि त्यावर ठाकरेंकडून त्वरीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ठाकरे गटाच्या मुखपत्रातूनही राज ठाकरेंना सोबत येण्यासाठी हाक देण्यात आली आहे. मनसेसोबतच्या युतीसाठी ठाकरे गटाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून एक नवं पोस्टर समोर आलंय. वेळ आलीय, एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!.. अशा आशयाचं पोस्टर लक्ष वेधून घेतलं. दरम्यान पूर्वाश्रमीचे मनसेचे नेते आणि सध्या ठाकरेंच्या सेनेत असलेले वसंत मोरे यांनी दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी बऱ्याच पक्षांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा निर्माण झाला आहे, असं म्हटलंय.

विधानसभा निवडणुकीत मनसेला भोपळाही फोडता आला नाही. तर ठाकरेंचे केवळ 20 आमदार निवडून आलेत. सुमारे गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. त्यामुळेच बीएमसीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन्ही पक्षांसाठी अस्तीत्वाची लढाई आहे. त्यामुळेचे दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. अस्तित्व टिकवण्यासाठी का होईना पण दोन्ही ठाकरे एकत्र येतील असं तरी सध्याचं चित्र आहे मात्र या दोन भावांच्या युतीचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात, ते पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT