Tanaji Sawant Saam tv
महाराष्ट्र

Tanaji Sawant: तानाजी सावंत यांची आमदारकी जाण्याची शक्यता; औरंगाबाद खंडपीठाने बजावली नोटीस

Tanaji Sawant: शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. सावंत यांनी मतदारांना आमिष दाखवून मते मागितल्याचा आरोप केला जात आहे.

Bharat Jadhav

शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत यांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आमिष दाखल्याचा आरोप करण्यात येत आहे. मतदारसंघातील मतदारांना त्यांनी भांडे,पैसे वाटप केल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी केलाय. याप्रकरणी राहुल मोटे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केलीय आहे.

माजी आमदार राहुल मोटे यांनी याचिका दाखल करताना न्यायालयात त्याबाबतचे पुरावे देखील जमा केली आहेत. यानंतर औरंगाबाद खंडपीठाने तानाजी सावंत यांना नोटीस बजावलीय. सावंतांसह त्यांचे बंधू शिवाजी सावंत आणि अर्चना दराडे यांनाही नोटीस बजावलीय. तानाजी सावंत हे परंडा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत सावंत यांची लढत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोटे यांच्याशी होती.

या निवडणुकीत तानाजी सावंत यांचा विजय झाला. परंतु त्यांनी मतदारांना आमिष दाखवून मते मागितल्याचा दावा मोटे यांनी केलाय. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे.

तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्यांकडून तरुणाला मारहाण

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने सावंत पुन्हा चर्चेत आले होते. रत्नदीप चव्हाण याला तानाजी सावंतांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय. याप्रकरणी अंजली दमानिया यांनी ट्वीट करत तानाजी सावंत यांच्यावर टीका केली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर रत्नदीप चव्हाण यांचा एक मेसेज पोस्ट केला होता. त्यामध्ये तानाजी सावंतांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत.

मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली?

माजी मंत्री तानाजी सावंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी गेले असताना त्यांना वेळ देण्यात आली नव्हती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तानाजी सावंत यांनी काढलेले कोट्यवधी रुपयांच्या टेंडरला स्थगिती दिली होती. त्यानंतर विधीमंडळाचे अधिवेशनाच्या काळात त्यावेळी तानाजी सावंत फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर गेले होते. परंतु फडणवीस यांनी त्यांना भेटीसाठी वेळ दिली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात नसरापूरमध्ये महिलेला हिप्नॉटाइज करत भरदिवसा सोन्याची लूट

Ladki Bahin Yojana: लाडकीच्या पैशांवर पुरुषांचा 'डल्ला'! 14 हजार पुरुषांनी लाटले 21 कोटी| VIDEO

दलित तरुणाला विवस्त्र करत बेदम मारहाण, खामगावात संतापजनक प्रकार

Bhoplyachi Puri Recipe : श्रावण स्पेशल डिश, गावाकडे बनवतात तशी खुसखुशीत भोपळ्याची पुरी

Shravan Recipe: श्रावणात नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत बटाट्याचे काप, फक्त १० मिनिटांत

SCROLL FOR NEXT