Sushma Andhare Sanjay Raut  Saamtv
महाराष्ट्र

Sushma Andhare News: 'लावारिस पेड ट्रोलर्स अन् हुकूमशाही विरोधातला विद्रोह...' सुषमा अंधारेंच्या राऊतांना खास शैलीत शुभेच्छा; पोस्ट व्हायरल

Sanjay Raut Birthday: शिवसेना ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ, फायरब्रँड नेते, सामनाचे संपादक, खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस.

Gangappa Pujari

गिरिश कांबळे, प्रतिनिधी

Sushma Andhare News:

शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांचा आज वाढदिवस. आपल्या रोखठोक भूमिकांसाठी, बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संजय राऊतांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संजय राऊतांप्रमाणेच ठाकरे गटाची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारेंनी आपल्या खास शैलीत राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांची फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

सुषमा अंधारेंची पोस्ट त्यांच्याच शब्दात...

शिवसेनेचे चिलखत....

आपला वाढदिवस हा निष्ठावंत शिवसैनिकांसाठी "निष्ठा"दिवस आहे. लोकशाहीची प्रचंड आसक्ती असणारा माणूस सभोवतालची बेबंदशाही, हुकूमशाही झुगारून जिवाच्या आकांताने लढतो. त्याची लढाई येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या सुरक्षित भवितव्याची चिंता आणि आशंका मांडते. ही समष्टी ची लढाई म्हणजे हुकूमशाही विरोधातला विद्रोह जणु.

पण ज्यांना हा विद्रोह कळत नाही, जे समजुन उमजून सोयीस्कर रित्या आपला स्वार्थ साधण्यासाठी मौन बाळगतात. अशांसाठी कविश्रेष्ठ नामदेव ढसाळ दादा जे बिरूद वापरतात ते योग्यच. पण सत्तेसाठी जी हुजुरी करणारे, प्रसंगी आपल्या पाठीला रबर नाही कणा आहे हे विसरणारे माञ मग थयथयाट करतात. जसा गद्दारांवर आपण केलेल्या हल्ल्यानंतर काल काहींनी थयथयाट केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर, माझ्यासाठी आपण कायम कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती. सगळ्यांना सांभाळून घेणारा मोठा भाऊ असे वाटत राहिलात. पक्षप्रवेशनांतर आपल्याला भेटायचे तोच सुड भावनेतून झालेल्या ED च्या कारवाईमुळे आपल्याला भेटता आले नाही. आपल्या गैरहजेरीत माझ्या परीने खिंड लढवण्याचा प्रयत्न केला. पण आपला अत्यंत लढाऊ आणि कर्तबगार असा मोठा भाऊ काही काळासाठी सोबत नाही ही उणिव आम्हाला अधिक जबाबदारीने वागण्याचे भान देत होती.

सामना च्या संपादकीय मधला रोखठोक बाणा आपल्या वागण्या जगण्यात ही आहे. हे आपले टीकाकार ही अमान्य करणार नाहीत. सर, ज्यांना बहिण-भाऊ किंवा बाप-लेक अशी नातीच ज्ञात नाहीत किंवा त्यांच्या घरात तसे संस्कारच शिकवले नाहीत असे तद्दन बौद्धिक दिवाळखोर जेव्हा त्यांच्या कुटुंब, संघटना तथा नेतृत्वाच्या संस्काराचा विकृत परिचय देतात...

ज्या त्वेषाने आपण गद्दार गँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या दांभिकतेवर तुटून पडताय जिवाच्या आकांताने हा मातोश्रींचा गढ वाचवण्यासाठी निकराची झुंज देत आहात ती केवळ अतुलनीय आहे. लावारिस पेड ट्रोलअर्स, स्लीपर सेल मधले गद्दार, एवढं धमकावून ही हा बधत कसा नाही हा विचार करुन हार मानणारी शाऊटींग ब्रिगेड, अन् मातोश्री ने भरभरून दिल्यावरही बेईमान होणारे स्वार्थी नेते या सगळ्यांना आपण तोंड देत आहात. आपला ऊर्जास्व लढा फलद्रूप होवो या सदिच्छासह पुनश्च एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT