Sushma Andhare Saam Tv
महाराष्ट्र

Sushma Andhare News: 'महापत्रकार परिषदेमुळे भाजपचा जळफळाट, EDची कारवाई सुडबुद्धीने..' सुषमा अंधारेंचे टीकास्त्र

Maharashtra Politics: "जनता न्यायालयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा मांडला. या पत्रकार परिषदेनंतर भाजपचा जळफळाट झाला आहे. त्यामुळेच जनता न्यायालयावरून लक्ष हटवण्यासाठी सूरज चव्हाण यांना अटक केली," असा गंभीर आरोप सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावेळी केला.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. १८ जानेवारी २०२४

Sushma Andhare Press Conference:

ठाकरे गटाचे नेते सुरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर आज ठाकरे गटाला दुसरा धक्का बसला असून आमदार राजन साळवी यांच्यावरही बेकायदा संपत्ती जमा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसत्रानंतर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून भाजप- शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

"जनता न्यायालयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा मांडला. या पत्रकार परिषदेनंतर भाजपचा जळफळाट झाला आहे. भाजपला भीती वाटायला लागली आहे. त्यामुळेच जनता न्यायालयावरून लक्ष हटवण्यासाठी सूरज चव्हाण यांना अटक केली," असा गंभीर आरोप सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी यावेळी केला.

सुडबुद्धीने कारवाई..

तसेच "आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) पालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात मोर्चा काढला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अजित पवार भाजपसोबत गेले. ललित पाटील प्रकरणही भाजप दाबून टाकण्याचा प्रयन्त करत आहे. जेव्हा जेव्हा आमच्याकडून मोठी घटना होत्या त्यावेळी भाजप सुड बुद्धीने कारवाई करते," अशी टीकाही सुषमा अंधारे यांनी यावेळी केली.

"कुटे ग्रुपचे मालक सुरेश कुटेंवर बीडमध्ये धाड पडली. धाड पडल्यानंतर पाचव्या दिवशी बावनकुळेंच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यावरील कारवाई थांबली, यावर कोणी का बोलत नाही. भावना गवळी, यशवंत जाधव हे जर निर्दोष असतील तर यातील किती लोकांनी अब्रू नुकसानीचा दावा केला किंवा माफी मागण्याची मागणी केली," असा सवालही अंधारेंनी यावेळी उपस्थित केला. (Latest Marathi News)

दादांवर निशाणा...

"पंतप्रधानांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) ७० हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला होता, आता पंतप्रधान माफी मागणार का? किंवा दादा पंतप्रधानावर अब्रू नुकसानीचा दावा करणार का?" असा टोलाही अंधारेंनी यावेळी लगावला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : अबब! राज्यात पैशांचा महापूर, आचारसंहितामध्ये आतापर्यंत ५३६ कोटींची मालमत्ता जप्त!

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT