Sushma Andhare Saam TV
महाराष्ट्र

Sushma Andhare News: 'दादा भुसे, शंभुराज देसाईंची नार्को टेस्ट करा..' ललित पाटील प्रकरणी सुषमा अंधारेंची मोठी मागणी

Sushma Andhare On Lalit Patil: गेल्या १५ दिवसांपासून फरार असलेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अटक करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

सचिन जाधव, प्रतिनिधी

Sushma Andhare News:

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी चेन्नई येथून ललित पाटील याला ताब्यात घेतलं आहे. ललित पाटील प्रकरणाने राज्याचे राजकारणही चांगलेच ढवळून निघाले होते. या अटकेनंतर पुन्हा एकदा ललित पाटील प्रकरणावरुन सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

"ललित पाटीलला अटक झाली चांगले झाले,पण काही प्रश्नांची उत्तरे येणे अपेक्षित आहे. भाजप या गोष्टीचा श्रेयवाद घेत असेल तर फरार झाली यांची जबाबदारी पण गृहमंत्री म्हणून फडणवीसांनी घ्यायला हवी. अशा शब्दात अंधारेंनी निशाणा साधला. तो नाशिकमध्ये कारखाना कसा उभा करु शकतो. बाकी सगळ्या घडामोडी कशा घडू शकतात.." असा सवालही अंधारेंनी उपस्थित केला.

तसेच "पक्षभूमिका राष्ट्रप्रथम असेल तर तरुण, आरोग्य आणि भवितव्य याचा विचार करावा. आता या घटनेचा तपास करायला हवा,यामध्ये राजकीय लोक आहेत. दादा भुसे, शंभुराज देसाईंची नार्को टेस्ट करा" असेही अंधारे यावेळी म्हणाल्या.

यावेळी पुढे बोलताना "आज फडणवीस पुण्यात आहेत, ज्या हॉटेलमधून ललित पाटीलने पलायन केले, त्याच लेमनट्री हॉटेल मध्ये फडणवीस येणार आहेत ,तिकडे बैठकही होणार आहे.. " असेही सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या. तसेच राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून ललित पाटीलचा जय सिंघानिया होऊ नये.. असा टोलाही अंधारेंनी लगावला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

Matru Vandana Yojana: गर्भवती महिलांना मिळतात ६००० रुपये; केंद्राची मातृत्व वंदना योजना नक्की आहे तरी काय?

Viral Video: प्रवाशांची हातापायी आता थांबणार, प्रवाशाने ट्रेनमध्ये बसण्यासाठी शोधला अजबच जुगाड; पाहा व्हायरल VIDEO

SCROLL FOR NEXT