Sushma Andhare On Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मुख्यमंत्री संकटकाळात देवाची धावा करत आहेत, सुषमा अंधारेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Sushma Andhare On Eknath Shinde: संकटकाळ आला की माणूस देवाकडे धाव घेतो अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

Chandrakant Jagtap

>>संजय सूर्यवंशी, नांदेड

Maharashtra Politics Latest News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी मिसिंग नसून संकट आल्याने देवाच्या धावा कारायला गेले असा टोला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. त्या नांदेड मध्ये बोलत होत्या.

सुषमा अंधारे म्हणाल्या, पूजाअर्चा करायची एकनाथ शिंदे यांना सवय आहे. यापूर्वी देखील त्यांनी अनेक देवाच्या पूजा केल्या आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा आहे. असा संकटकाळ आला की माणूस देवाकडे धाव घेतो अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली.

तसेच राजीनामा देण्याच्या केंद्राच्या सूचना, नागपूरमध्ये फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून लागलेले बॅनर आणि खारगर दुर्घटनेमुळे त्यांच्यावरील दबाव यामुळे उमेद शोधण्यासाठी ते गेले असावे असा टोला सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

वक्तव्य बदलणारे फडणवीस - सुषमा अंधारे

यावेळी सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. त्या म्हणाल्या, आगामी काळातील सर्वच निवडणुका शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार असं फडणवीस म्हणाले. मात्र ते नेहमी वक्तव्य बदलतात. राष्ट्रवादीसोबत कधीही युती नाही असं ते बोलले होते, पण त्यांनी अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी केला होता".

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, वक्तव्य बदलण्यात देवेंद्र फडणवीस माहीर आहेत. शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणूक लढणार असं म्हणणारे फडणवीस यांनी गुजराती वृत्तपत्रात शिंदेंच्या राजीनाम्याच्या बातमीवर भाजपाची भूमिका काय? याचे उत्तर द्यावे असे म्हटले आहे.

उध्दव ठाकरेंची भूमिका स्पष्ट - अंधारे

सुषमा अंधारे यांनी सांगितले की, बारसु रिफायनरीबाबत उध्दव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. विकास करताना कोणालाही विस्तापित करु नका अशी भूमिका उध्दव ठाकरे यांची आहे. फडणवीस यांनी ध चा म करु नये. या विषयावरुन वातावरण भ्रमित करु नये, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: अब्दुल सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद; ठाकरे आणि भाजपची युती?

Horoscope: जुन्या मित्रांची होईल भेट, जोडीदाराचा सुटेल अबोला; जाणून घ्या तुमची राशीत आहे काय?

Assembly Election: राज्यात जातीवर आधारित मतदान नाही; अजित पवारांच्या विधानाने महायुतीला टेन्शन

Horoscope : तुम्हाला अचानक… राशीत काय? चांगलं की वाईट?

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

SCROLL FOR NEXT