अक्षय बडवे, प्रतिनिधी
राष्ट्रवादी अजित पवार आणि शरद पवार गटातील संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. निवडणूक आयोगासमोर सध्या राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरू असून त्यामध्ये अजित पवार गटाकडून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावरुन खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटातील नेत्यांवर हल्लाबोल केला.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
शरद पवार (Sharad Pawar) यांनीच भाजपसोबत जाण्यासाठी चर्चा केली होती.. असा आरोप अजित पवार गटाच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. यावरुनच सुप्रिया सुळे यांनी बोलताना "शरद पवार यांना कधीही भाजपसोबत जायचे नव्हते. भाजपसोबत जायचे हे लक्षात आल्यामुळे त्यांनी नाराज होऊन राजीनामा दिला.." असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला.
मला अध्यक्ष होण्याचा प्रस्ताव..
तसेच यावेळी पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी "मला पक्षाच्या अध्यक्षपदाची ऑफर होती. मी अध्यक्ष झाल्यानंतर भाजपमध्ये (BJP) जाण्याचा निर्णय करणार होते असं ते म्हणत आहेत पण मला ते अशक्य होतं.." असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या
पहाटेच्या शपथविधीवरुन मोठे विधान...
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरुनही मोठे विधान केले. "छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) विधानावरुन पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै रोजी झालेला शपथविधी शरद पवार यांना अंधारात ठेऊन घेतला गेला हे स्पष्ट झाले आहे, असे त्या म्हणाल्या. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.