Political News  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाराष्ट्रात येत्या १५-२० दिवसांत मोठी उलथापालथ; सत्ताधारी नेत्याकडून राजकीय भूकंपाचे संकेत

Sunil Tatkare News : महविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षात आज अस्वस्थता आहे. या सर्वच पक्षातील मोठ्या नेत्यांच्या मनातही राजकीय भवितव्याबाबत अस्वस्थता आहे, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शरद पवार गटाचा हा नेता जयंत पाटील असल्याची चर्चा देखील सुरु होता.

मात्र जयंत पाटील यांनी याबाबत खुलासा केला आहे. या सर्व अफवा असल्याचं स्वत: जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा दावा केला आहे.

महविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षात आज अस्वस्थता आहे. या सर्वच पक्षातील मोठ्या नेत्यांच्या मनातही राजकीय भवितव्याबाबत अस्वस्थता आहे. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने राजकीय योग्य पर्याय काय आहे तो शोधण्याचा प्रयत्न करत असतील.

मला या विषयावर आज काही बोलायचे नाही. पण नजिकच्या 15 -20 दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी राज्यात पाहायला मिळतील, असा दावा सुनील तटकरे यांनी केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जयंत पाटील माझ्या संपर्कात नाही- बावनकुळे

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर त्याला आम्ही सोबत घेऊ. पण मला याबाबद्दल कुठलीही माहिती नाही माझ्या संपर्कात नाही. जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत. असं कुणाबद्दल मी बोलणार नाही. ते माझ्या तरी संपर्कात नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं.

जयंत पाटील काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातील बड्या नेत्याबाबत येणाऱ्या बातम्या केवळ अफवा आहे. जयंत पाटील यांनी 'साम टीव्ही'ला ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार एकसंघ असून येत्या दोन-तीन दिवसात जागा वाटपाचा अंतिम निर्णय पूर्ण होणार असल्याची महिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केवळ विरोधकांबाबत संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका जयंत पाटलांनी सत्ताधारी गटावर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

Kinetic DX EV: ४१ वर्षांनंतर कायनेटिक स्कूटर नव्या रंगात, फिचर्स आणि किंमत जाणून घ्या

Viral Video: मांडीवर मांडी अन् घट्ट मिठी, धावत्या रेल्वेत कपलचे अश्लील कृत्य; VIDEO व्हायरल

Maharashtra Tourism: महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यात आहे सर्वात छोटं हिल स्टेशन; सौंदर्य तुम्हालाही पाडेल भूरळ

World Hepatitis Day: हिपॅटायटीस टाळण्यासाठी हे सोपे उपाय नक्की करा

SCROLL FOR NEXT