Sunil Tatkare On Praful Patel  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: खरंच NCP च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाली का?, सुनील तटकरेंनी स्पष्ट सांगितलं...

Sunil Tatkare On Praful Patel: महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजप नेते पियुष गोयल यांनी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

Priya More

Summary -

  • प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्याच्या चर्चांना सुनील तटकरे यांनी पूर्णविराम दिला

  • पियुष गोयल यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली

  • राज ठाकरे यांच्या ट्वीटवरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली

  • अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीतील नेतृत्वाबाबत चर्चा वाढल्या

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे सर्व अधिकार प्रफुल्ल पटेल यांच्या हातामध्ये देण्यात आले. भाजपचे वरिष्ठ नेते पियुष गोयल यांनी एका मुलखातीमध्ये बोलताना हे मोठं विधान केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत 'असा काही निर्णय झालेला नाही.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा. पाटील असावा पण पटेल नाही!' असे ट्वीट मसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना सुनील तटकरे यांनी सांगितले की, 'राज ठाकरेंनी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही एकत्रित बसून पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आमदारांच्या भावना या लक्षात घेऊन निर्णय घेऊ.'

राज्यसभेसाठी पार्थ पवार यांच्या नावाला विरोध आणि जय पवार यांच्या नावाला पसंती दिली जात असल्याची माहिती समोर आली. यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे म्हणाले की, 'आम्ही आमच्या पक्षाचा राज्यसभेचा उमेदवार कोण करायचा तो आमचा अधिकार आहे. भाजपने आमच्या पक्षाला नेहमी सहकार्य केले आहे. याबाबतीत कधीही त्यांनी आम्हाला सूचना केल्या नाहीत. यापूर्वीसुद्धा पक्षाचे मंत्रिमंडळ करताना, पक्षाचे इतर काही निर्णय करत असताना भाजपने आम्हाला कधी काही सूचना केल्या नाहीत.'

तसंच, 'मित्रपक्षाला सन्मानाने कसे वागवावे याचे उत्तम उदाहरण आम्हाला आता एनडीएमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली अनुभवायला मिळत आहे. यूपीए असताना काय परिस्थिती होती ती मी अनुभवली आहे. एनडीएमध्ये आता मी अनुभवत आहे.', असे सुनील तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, अजित पवार यांचा बुधवारी २८ जानेवारीला विमान अपघात झाला होता. बारामती दौऱ्याला विमानाने जात असताना ही घटना घडली होती. बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'डॉक्टरांचा विश्रांती घेण्याचा सल्ला, त्यामुळे...; राज्यसभेसाठी अर्ज भरल्यानंतर शरद पवारांची सोशल मीडियावर खास पोस्ट

युद्धात ग्रॅव्हिटी बॉम्ब विध्वंस घडवणार? अमेरिकेचे सर्वात घातक अण्वस्त्र

Maharashtra Live News Update : क्लास चालू असतानाच कोसळला स्लॅब, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, कोपरखैरणेमधील घटना

राज्यसभेवरून मविआत नाराजीनाट्य? पवारांना उमेदवारी ठाकरे नाराज?

IND vs ENG Semi Final: वानखेडेवर संजू सॅमसनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई, टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT