Sujay Vikhe Patil Saam Tv
महाराष्ट्र

Sujay Vikhe Patil : सुजय विखे पाटील धमकी प्रकरणी पोलिसांच्या कामाला वेग; चौकशीसाठी एक जण ताब्यात

Sujay Vikhe Patil Threatened : सुजय विखे यांना शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी निवृत्ती उर्फ नाना घाडगे या कार्यकर्त्याला पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळालीये.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics Sujay Vikhe News :

महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील धमकी प्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून सदर व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. त्यात अशा पद्धतीने धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पारनेर तालुक्यातील कळस या गावात दोन कार्यकर्त्यांची संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये सुजय विखे यांना शिवीगाळ करत गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी निवृत्ती उर्फ नाना घाडगे या कार्यकर्त्याला पारनेर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळालीये.

सुजय विखेंनी स्वत: यावर प्रतिक्रिया दिलीये. " पारनेरच्या गोरगरीब जनतेने या आधी बराच काळ दहशदीमध्ये आयुष्य जगलं आहे. मात्र, आत मी आता तुम्हाला दहशदीत जगू देणार नाही. पारनेर आणि अहिल्यादेवी नगरच्या जनतेला दहशदीच्या वातावरणातून बाहेर मी बाहेर काढणार. त्यासाठीच मी लोकसभेत जात आहे, असं सुजय विखे पाटलांनी धमकीवर प्रतिक्रिया देताना म्हटलं.

मला किती गोळ्या घालायच्या, तेवढ्या घाला. मात्र, आता सुजय विखे पाटील अजिबात मागे हटणार नाही. 4 जूनला समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होणार, हे माझ्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या, अशी शब्दांत सुजय विखेंनी विरोधकांवर निशाणा साधला.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांची तयारी सुरू आहे. सर्वच उमेदवार आपल्या मदतारसंघातील नागरिकांना विविध आश्वासने देत आहेत. त्यात आलेल्या धमकीवरून सुजय विखे पाटलांनी थेट विरोधकांचं डिपॉझिट जप्त होणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Vs Pomegranate Fruit Benefits: केळी खावी की डाळिंब? डॉक्टरांच्या मते 'हे' फळ देतं शरीराला दुप्पट ताकद; पाहा आश्चर्यकारक फायदे

Maharashtra News Live Update: 7 वर्षांनी बेपत्ता लेक घरी परतला! आई-वडिलांच्या आनंदाश्रूंनी फुललं घर

Gondhal Movie: ऑस्करच्या शर्यतीत मराठी चित्रपटाची एंट्री! 'गोंधळ'ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 हजाराच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर

Blast: नमाज पठण करताना मशिदीत भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT