Manasvi Choudhary
केळी आणि डाळिंब ही दोन्ही फळे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. या दोन्ही फळांमधील गुणधर्म वेगवेगळी आहेत.
केळीमध्ये पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 6 असेत तर डाळिंबामध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी, फायबर हे गुणधर्म असतात.
अनेकांना केळी आणि डाळिंब या दोन्ही फळांमधील फरक समजत नाही, आरोग्यासाठी कोणते फळ सर्वाधिक फायदेशीर आहे ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
डाळिंब आणि केळी दोन्ही खाल्ल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. एका केळीमध्ये ०.२६ मिली ग्रॅम लोह असते तर डाळिंबाच्या दाण्यांमधून ०.३ मिली ग्रॅम लोह मिळते.
१०० ग्रॅम केळीमध्ये अंदाजे ०.३७ मिलि ग्रॅम व्हिटॅमिन बी ६ असते तर डाळिंबाच्या दाण्यांमधून ०.०८ मिली ग्रॅम व्हिटॅमिन बी ६ मिळते.
केळीमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तर डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.
केळीमधील उच्च पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे बिपी देखील कंट्रोलमध्ये राहते. हृद्याचे आरोग्य सुधारते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.
next: Health Tips: डायबिटीजसाठी कारलेच नाही, 'या' ५ भाज्याही गुणकारी, साखर राहील कंट्रोलमध्ये