Health Tips: डायबिटीजसाठी कारलेच नाही, 'या' ५ भाज्याही गुणकारी, साखर राहील कंट्रोलमध्ये

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीज असणाऱ्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधोपचारच नाही, तर योग्य आहार देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो.

Diabetes | pinterest

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या आहारात तुम्ही काय खाता हे अत्यंत महत्त्वाचे असते. बऱ्याचदा लोकांना असे वाटते की डायबिटीजमध्ये फक्त कारलेच खावे, पण कारल्याशिवाय अशा अनेक पौष्टिक भाज्या आहेत

Blood sugar control | pinterest

दुधी भोपळा

दुधी भोपळा हा पचनासाठी अतिशय हलका आणि पौष्टिक मानला जातो. दुधीमध्ये पाणी आणि फायबर असते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि शरीर हायड्रेट राहते.

Bottle Gourd | pinterest

दोडका

दोडक्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच यात इन्सुलिनसारखे गुणधर्म असतात, जे नैसर्गिकरित्या मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Ridge Gourd

कारले

डायबिटीजचे रूग्ण कारले खातात. कारले नैसर्गिकरीत्या रक्तातील साखर कमी करण्यास आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.

Bitter Gourd

भेंडी

भेंडीमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे शरीरातील साखरेचे शोषण कमी करते आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

Okra | pinterest

काकडी, मुळा, टोमॅटो आणि गाजर सॅलड

जेवणासोबत किंवा जेवणापूर्वी कच्च्या भाज्यांचे सॅलड खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे. काकडी, मुळा आणि टोमॅटोमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, ज्यामुळे साखरेची पातळी अचानक वाढत नाही.

Salads

next: Coconut Oil vs Mustard Oil : नारळाचे तेल की मोहरीचे तेल? आरोग्यासाठी कोणते तेल फायदेशीर?

Coconut Oil vs Mustard Oil
येथे क्लिक करा..