Raj-Uddhav Thackeray Rally Invitation saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: मराठीवरून मविआत फूट? ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला दोन्ही काँग्रेसचा दुरावा

Raj-Uddhav Thackeray: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात काँग्रेस सहभागी होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसला या मेळाव्याचं निमंत्रण देण्यात आलेले नाहीये.

Bharat Jadhav

राज्यात त्रिभाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको, अशी भूमिका राज्यातील अनेक संघटना आणि विरोधी पक्षांची होती. या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने एकत्रितपणे मोर्चाचं हत्यार उपासलं होतं. पण त्यआधीच सरकारकडून त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द करण्यात आले. मात्र आता त्याच दिवशी ठाकरे बंधू एकत्र येऊन विजयी मेळावा साजरा करणार आहेत. यावरून ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याचवेळी महाविकास आघाडीत फूट पडल्याचं दिसत आहे.

कारण ठाकरे बंधूच्या मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला देण्यात आलेले नाहीये. पण ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याला शरद पवारही जाणार नसल्याचं समोर आले आहे. शरद पवार कोणत्या कारणामुळे मेळाव्याला जाणार नाहीत, हे याबाबत कोणतेच कारण समोर आले नाहीये. ५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचे निमंत्रण काँग्रेसला मिळाले नसल्याचे म्हटले जातंय. आम्हाला अजून तसे काही निमंत्रण मिळालेले नाही किंवा सांगण्यात आले नाहीये. हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा इव्हेंट असेल असं म्हटलं जात आहे.

दरम्यान अद्याप जीआर रद्द झालेला नाहीये. हिंदी भाषा सक्तीबाबत नरेंद्र जाधव समिती नेमण्यात आलीय. त्यामुळे ‘मुंह में राम, बगल में नथुराम’ या भाजपाच्या नितीपासून जपून राहणं आवश्यक आहे. ५ जुलैचा दिवस मराठी लोक साजरा करतील, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अतुल लोंढेंनी दिली होती.

शरद पवार यांना या मेळाव्यात बाबत प्रश्न करण्यात आला होता. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात तुमचा पक्ष सहभागी असणार का, असा प्रश्न करण्यात आला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ठाकरे बंधूंच्या मेळाव्याबाबत माहिती नाही. पण आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल मला भेटले. ते म्हणाले होते की, या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांचा निर्णय हा आम्हाला शिरसावंद्य असतो, असे शरद पवार म्हणाले. तुम्ही या मेळाव्याला जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर शरद पवार यांनी नकारात्मक उत्तर दिलं.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उद्धव सेनेशी जवळीक वाढल्याच्या मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हा त्यांचा घरगुती विषय आहे. एखादा व्यक्ती काँग्रेसच्या विचारांना पूर्णपणे विरोध करणारा असेल, तर आम्ही त्या युतीला आक्षेप घेऊ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jupiter Vakri: 12 वर्षांनंतर गुरू ग्रह चालणार वक्री चाल; 'या' राशींचं भाग्य चमकणार, पद-प्रतिष्ठाही मिळणार

Todays Horocope: 'या' राशींच्या व्यक्तींना गुंतवणूकीतून फायदा मिळेल, वाचा राशीभविष्य

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

SCROLL FOR NEXT