Solapur South Constituency Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: आघाडीत बिघाडी! सोलापूरची जागा ठाकरे गटाला जाहीर, काँग्रेसच्या माजी आमदाराला उमेदवारीची अपेक्षा

Solapur South Constituency: दिलीप माने हे काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपात ही जागा काँग्रेसला सुटण्याचा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.

Priya More

Maharashtra Assembly Election: सोलापूर दक्षिणच्या जागा शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जाहीर करण्यात आली आहे. ही जागा ठाकरे गटाला गेली तरी देखील सोलापूरमधील काँग्रेसच्या माजी आमदाराला उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. महाविकास आघाडीत सोलापूर दक्षिणच्या जागेवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमर पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. असे असताना देखील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी फेसबुक पोस्ट करत उमेदवारीची आशा व्यक्त केली आहे.

दिलीप माने हे काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आहेत. त्यामुळे जागावाटपात ही जागा काँग्रेसला सुटण्याचा फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. त्यांची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'झा काँग्रेस पक्ष, त्याचे नेतृत्व आणि काँग्रेसच्या विचारधारेवर माझा संपूर्ण विश्वास आहे. आपल्या काँग्रेसचा पारंपरिक सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसलाच मिळणार आहे आणि तो आपणच लढणार आहोत..!'

या पोस्टमध्ये त्यांनी पुढे लिहिले की, 'आपल्याला आजवर मिळालेला जनतेचा पाठिंबा आणि विश्वास कायम ठेवत,आपण आहे त्यापेक्षा जास्त जोमाने आपला प्रचार सुरूच ठेवूया..! चला,परिवर्तन घडवूया..!' अशी पोस्ट शेअर करत विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार दिलीप माने यांनी केला आहे. मात्र काल स्वतः पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमर पाटील यांना एबी फॉर्म दिल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे. आता माजी आमदार दिलीप माने आणि अमर पाटील यांच्या दोघात महाविकास आघाडीकडून कोणाची उमेदवारी कायम राहते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

उज्ज्वला थिटेंना धक्का, अनगरचा नगराध्यक्ष ठरला; जिल्हा न्यायालयानं नेमका निकाल काय दिला? VIDEO

India Tourism : काश्मीर-मनाली नाही; गुलाबी थंडीत आवर्जून फिरा 'हे' ठिकाण, जोडीदार होईल खुश

SCROLL FOR NEXT