shahaji bapu patil criticized uddhav thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: कामाख्या देवीच्या दर्शनासाठी विमानाने गुवाहाटीला जाणार, शहाजी बापूंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

shahaji bapu patil criticized uddhav thackeray: 'कामाख्यदेवीच्या दर्शनासाठी विमानाने गुवाहाटीला जाणार.', असल्याचा टोला शहाजी बापू यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Priya More

उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यामध्ये झालेल्या सभेत शिंदे गटाचे आमदार आणि महायुतीचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केल होती. 'रेल्वेचे तिकीट काढून २३ तारखेला शहाजी बापू यांना गुवाहाटीला पाठवा.', असा टोला लगावला होता. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देत शहाजी बापू पाटील यांनी जोरदार पलटवार केला आहे. 'कामाख्यदेवीच्या दर्शनासाठी विमानाने गुवाहाटीला जाणार.', असल्याचा टोला शहाजी बापू यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

'उद्धवसाहेब मी २२ ला नाही तर २४ तारखेला गुवाहाटीला जाणार आणि कामाख्या देवीचे दर्शन घेणार. रेल्वेने जाणे इतकी आता परिस्थिती माझी नाजूक राहिलेली नाही. देवीचं दर्शन घेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणार असा टोला ही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.' रविवारी उध्दव ठाकरे यांची सांगोल्यात सभा झाली. सभेत ठाकरे यांनी रेल्वेचे तिकीट काढा आणि २३ तारखेला शहाजी बापू पाटील यांना गुवाहाटीला पाठवा तिकडं काय झाडी काय डोंगर मोजत बसतील.', अशा शब्दात शहाजी बापू पाटील यांचा‌ समाचार घेत त्यांची खिल्ली उडविली होती.

त्यानंतर शिंदें सेनेचे उमेदवार शहाजी पाटील यांनी रेल्वे नाही तर विमानाने जावून कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला जाणार असं ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर दिले. 'महाविकास आघाडीतील अनेक मोठ्या नेत्यांना माझ्या पराभवाची चिंता लागली आहे. शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांच्या एकत्र विचाराने मला पराभूत कसं करता येईल यातील डावपेचाचा एक भाग म्हणून महाविकास आघाडीचे दोन उमेदवार दिलेले आहेत. मी आमच्या महायुतीचा एक उमेदवार आहे. त्यांनी‌ स्वप्न गणितं बेरजा वजाबाक्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. पण मला माहिती आहे. सांगोला तालुक्यातील मतदार या सर्व बेरजा उध्वस्त करेल. २३ तारखेला येथील जनता कामाच्या जोरावर विजयी करेल.' असा विश्वास ही आमदार शहाजी पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी; मुंबई-गोवा महामार्गावर ‘या’ वाहनांना बंदी

India Waterfall : धबधब्याचं पाणी चक्क आकाशाकडे जातं! भारतातच पाहायला मिळतो निसर्गाचा 'हा' अद्भुत चमत्कार

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगमध्ये दोन गटात तुफान दगडफेक

विकासकामांच्या नावाखाली 100 कोटींचा घोटाळा? नगरसेविकेची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

SCROLL FOR NEXT