Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Latest Update SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता.. शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप

Maharashtra Loksabha Election: शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता, असा खळबळजनक आरोप केला आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता.२८ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट तसेच ठाकरे गटात जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरेंच्या सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याचा कट रचला होता, असा खळबळजनक आरोप केला आहे.

काय म्हणाले राजू वाघमारे?

"महाविकास आघाडीची सत्ता असताना हॉटेल हयात मध्ये संजय राऊत यांनी दोन बैठका घेतल्या होत्या. उध्दव ठाकरे यांना बाजूला करून आपण सत्ता स्थापन करू, असा त्यांचा डाव होता. ज्या पक्षात राहतो त्याच पक्षाच्या नेत्याला बाजूला करण्यासाठी पुढाकार घेतला. अजित पवार, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर या मीटिंगमध्ये उपस्थित होते," असा मोठा दावा राजू वाघमारे यांनी यावेळी केला.

तसेच "गडचिरोलीत एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता. त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरेंकडून सुरक्षा देण्यात आली नव्हती. एकनाथ शिंदेंना बाजूला करुन आदित्यला मुख्यमंत्री करायचे होते, असा खळबळजनक आरोपही राजू वाघमारे यांनी यावेळी केला. तसेच मी एक दिवसाआड एक एक गोष्ट बाहेर काढणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

दरम्यान," काँग्रेसकडून सतेज पाटील यांना लोकसभा लढण्याच्या स्पष्ट सुचना होत्या. मात्र त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले. स्वतः वरचे संकट त्यांनी टाळत महाराजांना रिंगणात उतरवले, असा दावाही राजू वाघमारे यांनी यावेळी केला. तसेच शाहू महाराजांचा अवमान केल्याबद्दल राहुल गांधी आणि सतेज पाटील यांनी माफी मागावी," अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Body Election: मतदानाआधी पिंपळपारमध्ये पैसे वाटप,निलेश राणेंचा भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

Maharashtra Nagar Parishad Live : जालना जिल्ह्यातील नगरपालिका मतदान टक्केवारी

Kalyan News: शहरात एकाच नंबरच्या दोन रिक्षा; दंड ठोठावल्यानंतर झाला कल्याणमधील बनावट नंबरप्लेटचा पर्दाफाश

Local Body Election: पैसे वाटप करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्याला पकडलं; संतप्त नागरिकांनी मतदान केंद्राबाहेरच चोपलं

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

SCROLL FOR NEXT