Shambhuraj Desai On Dry Day: राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका सर्व्हेक्षणाच्या आधारे शिंदे गटाने जाहीर केली आहे. शिंदे गटाच्या या जाहिरातबाजीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या जाहिरातीमुळे भाजपातील नेते नाराज झाल्याचंही बोललं जात आहे.
त्यानंतर आता शिवसेनेकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनी हा सर्वे कोणी केला आणि जाहिरात को दिली हे माहिती नसल्याचे सांगितले आहे. तसेच यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी ड्राय डे बाबत मोठे विधान केले आहे...
काय म्हणाले शंभूराज देसाई...
सध्या ज्या जाहीरातीवरुन मोठा वाद सुरू आहे. त्याबद्दल बोलताना शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ही जाहिरात शिवसेनेने दिली नसल्याचे म्हणले आहे. "आजच्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाशी संबध नाही. सर्वे कुणी केला आणि जाहिरात कुणी दिली हे माहिती नाही. एखाद्या हितचिंतकाने दिली असावी," असे स्पष्टीकरण शंभुराज देसाई यांनी दिले आहे.
ड्राय डे बद्दल केले मोठे विधान...
तसेच यावेळी शंभूराज देसाई यांना लोकांची गैरसोय होत असल्याने ड्राय डे कमी करण्याबाबत काही आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर शंभूराज देसाई यांनी "लोकांची मागणी आल्यास त्याबाबतचा विचार करु.." असे विधान केले आहे.
अजित पवारांनीही लगावला टोला...
दरम्यान, वर्तमानपत्रात आलेल्या जाहीरातीवरुन मोठा वाद झाल्यानंतर अजित पवारांनीही (Ajit Pawar) याच मुद्द्यावरुन शिंदे- फडणवीसांवर निशाणा साधला आहे. "बाळासाहेबांचा फोटो जाहिरातीतून का वगळला? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर राष्ट्रामध्ये मोदी आणि राज्यात शिंदे ही घोषमा भाजपाचे नेते, कार्यकर्ते देतील का? असा प्रश्न अजित पवारांनी विचारला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.