Maharashtra Politics  Saam Digital
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कधी ठरणार? उद्धव ठाकरे यांनी स्पष्टचं सांगितलं

Maharashtra CM Candidate : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मात्र अद्याप महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरलेला नाही.

Sandeep Gawade

महाराष्ट्र निवडणुकांची आचारसंहिता येत्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही आघाड्यांनी अद्याप मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत मोठं विधान केलं आहे. आमच्याकडे मुख्यमंत्रि‍पदासाठी अनेक चेहरे आहेत. त्यांनी आधी आपला मुख्यमंत्री जाहीर करावा, असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले सरकारच्या प्रत्येक कृतीबद्दल संशय व्यक्त केला जात असून हे गंभीर आहे. आम्ही आमच्या उपाय योजना मांडणार आहोत. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात आम्ही काम केलं आहे. जातीय दंगली करण्याचा त्याच्या शेवटचा प्रयत्न असेल. आरोपींवर अटक झाली असेल पण २ पोलीस आयुक्त आहेत ना? नाना पटोले यांचा फोन टॅप केला जात होतो… तिथे लक्ष का दिलं जात नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

भाजपची दयनिय अवस्था झाली असून आधी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करू द्या. बंडखोरांच्या नेतृत्वात लढत आहेत. ही निवडणुक महाविकास आघाडी आणि महायुती अशीच होणार आहे. आमच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्याची अपेक्षित करत आहेत. ते सत्ताधारी आहेत. आधी त्यांनी त्यांचा चेहरा जाहीर करू द्या. आमचा आम्ही लगेच करू.

गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रात दौरे केले आहेत.लोकसभेच्या निकालाआधी कोणी मान्य करत नव्हतं. पण निकाल आला आणि आता लोकांना परिवर्तन हवं आहे. आम्ही ३१ जागा जिंकलो याचाच अर्थ लोकांना बदल हवा होता. आताही विधानसभेत हा बदल होणार हे नक्की आहे. आम्ही एक आहोत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री एकमताने ठरवू. महाराष्ट्र धोक्यात असून महाराष्ट्र वाचवायचा आहे. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही, खोकेवाल्यांसाठी आहे. महायुतीने महिन्याभरात २७८ निर्णय घेतले, अनेक महामंडळं जाहीर केले. मागच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यातील एक तरी महामंडळ सुरू आहे का, एकाला तरी निधी दिला का हे तपासण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंशी गद्दारी म्हणजे आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी : आमदार नितीन देशमुख

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

SCROLL FOR NEXT